फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध इंग्लड : भारतीय संघाचा महिला विश्वचषकाचा पाचवा सामना आज खेळवला जात आहे. आजचा सामना होलकर स्टेडियम मध्यप्रदेश येथे खेळवला जात आहे. भारताच्या संघाची याआधी इंग्लडविरुद्ध मालिका झाली होती यामध्ये त्यांनी मालिका जिंकली होती. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा सामना सुरु झाला आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाला पहिल्या दोन सामन्यामध्ये मिळालेल्या विजयानंतर दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे.
Virat Kohli Duck : विराट कोहलीच्या कारकीर्दला लागला कलंक, पुनरागमन सामन्यात रचला एक लज्जास्पद विक्रम
हरमनप्रीत कौरने या चारही सामन्यामध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. भारतीय संघाचे आजचा सामना धरुन तीन सामने अजूनही शिल्लक आहेत. भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी या तीनही सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. मागील सामन्यामध्ये स्मृती मानधना हीने कमालीची खेळी खेळली होती. पण त्याआधी ती देखील मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली होती. भारताच्या संघाला संघाच्या अनुभवी खेळाडूंकडून मोठी खेळीची अपेक्षा आहे.
CWC 2025: England won the toss and elect to bat.https://t.co/FuC0HqMExf #TeamIndia #CWC25 #INDvENG — BCCI (@BCCI) October 19, 2025
भारताच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे, टीम इंडियाची फलंदाज जेमिमा रोड्रिक्स हिला संघातून वगळण्यात आले आहे. चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह हरमन ब्रिगेड गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील. दरम्यान, नॅट सायव्हर-ब्रंटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड सात गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी तीन सामने जिंकले आणि एक पावसामुळे गमावला. इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आधीच अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत.
स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दिप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका ठाकुर
टॅमी ब्यूमोंट एमी जोन्स, हीथर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, एम्मा लँब, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल