फोटो सौजन्य - सोशल मिडिया
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर भारताच्या संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत कुवेत आणि यूएई सारख्या लहान संघांकडून पराभव पत्करावा लागला. पूल सी मध्ये कुवेतकडून २७ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत स्पर्धेतून बाहेर पडला. आता त्यांना बाउल सामन्यात यूएईकडून पराभव पत्करावा लागला आहे.
हाँगकाँग सिक्सेसमध्ये एकूण १२ संघ सहभागी होत आहेत. पहिल्या फेरीनंतर ८ संघांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या भारत, श्रीलंका, यूएई आणि नेपाळ यांच्यात बाउल सामने खेळवले जात आहेत. दिनेश कार्तिकच्या संघाला शनिवारी, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी हाँगकाँग सिक्सेसमध्ये कुवेतकडून २७ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला.
भारताने त्यांच्या पहिल्या गट फेरीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २ धावांनी (डीएलएस) पराभूत केले होते, परंतु कुवेतकडून पराभव पत्करल्यानंतर, भारताचा नेट रन रेट इतका घसरला की त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दरम्यान, पाकिस्तान आणि कुवेतने त्यांचे क्वार्टर फायनलमधील स्थान निश्चित केले आहे. कुवेत सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी निर्धारित ६ षटकांत भारताला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कुवेतचा कर्णधार यासीन पटेलने १४ चेंडूत ५८ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने २ चौकार आणि ८ षटकार मारले.
🚨 Big win for Kuwait against India in the Hong Kong Super Sixes! 🔥🇰🇼🇮🇳 They beat India by 27 runs. 🤯#HongKongSixes pic.twitter.com/09l5VyIje2 — ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) November 8, 2025
रॉबिन उथप्पा, प्रियांक पांचाळ, दिनेश कार्तिक आणि स्टुअर्ट बिन्नी सारखे दमदार फलंदाज असूनही, भारत फक्त ७९ धावा करू शकला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, टीम इंडिया पूर्ण ६ षटकही टिकवू शकली नाही. सर्व फलंदाज २ चेंडू शिल्लक असताना बाद झाले. अभिमन्यू मिथुनच्या धमाकेदार अर्धशतकाच्या आणि कार्तिकच्या १४ चेंडूत ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने युएईसमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले. तरीही भारताचा पराभव झाला. युएईने एक चेंडू शिल्लक असताना धावसंख्या गाठली.






