कुलदीप यादव(फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI Ranking : आयसीसीने एकदिवसीय गोलंदाजांची क्रमवारी बुधवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला फटका बसला आहे. कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. केर्न्स येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९८ धावांनी विजय मिळवून महाराजांनी पुन्हा अव्वल स्थान मिळवले. सामनावीर म्हणून निवडण्यात आलेल्या ३५ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज महाराजने ३३ धावांत पाच विकेट घेतल्या. त्याने कुलदीप आणि श्रीलंकेच्या महेश थिकेशनाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.
हेही वाचा : आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये महाराज काही काळ अव्वल स्थानावर होते. कुलदीप व्यतिरिक्त, गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे ज्याचा समावेश टॉप १० मध्ये झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सनेही गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने १८ धावा देत सहा बळी घेतले. तो १५ स्थानांनी झेप घेऊन १८ व्या स्थानावर पोहोचला. पाकिस्तानचा लेग स्पिनर अबरार अहमद १५ स्थानांनी झेप घेऊन ३९ व्या स्थानावर आणि वेस्ट इंडिजचा ऑफ-स्पिनर रोस्टन चेस पाच स्थानांनी झेप घेऊन ५८ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
पुरुषांच्या फलंदाजी क्रमवारीत शुभमन गिल ७८४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. श्रेयस अय्यर हा सहाव्या स्थानासह अव्वल १० मधील दुसरा भारतीय फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १२० धावा करणारा वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप दोन स्थानांनी पुढे सरकला. तर एडेन मार्कराम चार स्थानांनी पुढे ३ सरकून २१ व्या स्थानावर, टेम्बा बावुमा पाच स्थानांनी पुढे सरकून २३ व्या स्थानावर आणि मिचेल मार्श सहा स्थानांनी पुढे सरकून ४८ व्या स्थानावर पोहचून क्रमवारीत सुधारणा केली आहे.
हेही वाचा : BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
भारताचा अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा पुरुषांच्या टी२० क्रमवारीत पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव सहाव्या आणि यशस्वी जयस्वाल १० व्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिसने आपली सुधारणा सुरू ठेवली, नऊ स्थानांनी पुढे सरकून १२ व्या स्थानावर पोहोचला तर ऑस्ट्रेलियाचा मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल चार आणि १० स्थानांनी पुढे सरकून अनुक्रमे २५ त्या आणि ३० व्या स्थानावर पोहोचले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिस तीन स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर आणि जोश हेझलवूड दोन स्थानांनी प्रगती करत १८ व्या स्थानावर पोहचले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ४४ व्या स्थानावरून ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे.






