फोटो सौजन्य - X
अलिकडेच टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यावेळी अजित आगरकर आणि सुर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद देखील घतली होती. यामध्ये पत्रकारांनी भारताच्या संघामध्ये काही खेळाडू का नाहीत त्याचबरोबर काही खेळाडूंना संघामध्ये का घेतले आहे, याबाबतीत सांगितले. जून २०२३ मध्ये, बीसीसीआयने अजित आगरकर यांना टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता बनवले.
तेव्हापासून त्यांनी अनेक वेळा अशा उत्कृष्ट संघाची निवड केली आहे, ज्याने २ आयसीसी ट्रॉफी देखील जिंकल्या आहेत. आता बीसीसीआयने आगरकरला एक मोठी भेट दिली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, “बीसीसीआयने अजित आगरकरचा करार २०२६ पर्यंत वाढवला आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपवला आणि कसोटी आणि टी२० मध्ये चांगला बदल पाहिला. आगरकरनेही बीसीसीआयची ही ऑफर स्वीकारली आहे असे वृतांच्या माहितीनुसार सांगितले जात आहे.
🚨 AJIT AGARKAR TO STAY TILL JUNE 2026 🚨
– BCCI extended the contract as Chairman of Selection committee for Ajit Agarkar till June 2026. [Devendra Pandey from Express Sports] pic.twitter.com/fnK2hxBSfC
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2025
भारताच्या संघाने 2024 मध्ये टी20 विश्वचषक नावावर केला त्यानंतर चॅम्पियन ट्राॅफी देखील भारताने जिंकली होती. “अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कठीण काळही पाहिला आहे. जेव्हा आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि रोहित शर्मा-विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. तेव्हा इंग्लंड मालिकेपूर्वी रोहित-विराटने निवृत्तीची घोषणा केली.
यानंतर टीम इंडियासमोर अनेक प्रश्न होते जसे की शुभमन गिल कर्णधार म्हणून त्याच्या भूमिकेवर खरा उतरू शकेल का आणि कसोटीत विराट कोहलीची जागा कोण घेईल? तथापि, या सर्व प्रश्नांची उत्तरे इंग्लंड दौऱ्यावर मिळाली. या मालिकेत शुभमन गिलने उत्कृष्ट कर्णधारपद आणि चमकदार फलंदाजी दाखवली. गिलने ५ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक ७५४ धावा केल्या. ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. सध्या टीम इंडियाच्या निवड समितीमध्ये अजित आगरकर, एसएस दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस शरथ यांचा समावेश आहे.
आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
अहवालानुसार, या निवड समितीमध्ये बदल दिसून येऊ शकतो. बीसीसीआय एस शरथच्या जागी एका नवीन चेहऱ्याचा समावेश करू शकते.आता भारतीय संघाची नजर ही आशिया कपवर असणार आहे, या स्पर्धेत भारताच्या संघाचे कर्णधारपद हे सुर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तर संघाचे उपकर्णधारपद हे शुभमन गिलकडे असणार आहे.