फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये आज T२० विश्वचषकातील शेवटचा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर संघाने या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाही. आतापर्यत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे तीन सामने झाले आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानी एकही सामना गमावलेला नाही. दुसऱ्या बाजूला आहे भारताचा संघ, भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर संघाचे आतापर्यत ३ सामने झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत केलं आहे, तर न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येईल यावर एकदा नजर टाका.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T२० सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारच्या वेबसाईटवर असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल.
आता दोन्ही संघांमध्ये ३६ T२० सामने खेळले गेले आहेत . या 36 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने २५ वेळा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने ८ वेळा विजय मिळवला आहे. शारजाच्या मैदानावर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे भारताच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान असणार आहे.
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, संजीवन संजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, यास्तिका भाटिया, दयालन हेमा. राधा यादव, पूजा ड्रेसमेकर
बेथ मूनी, ॲलिसा हिली (विकेटकिपर/कर्णधार), एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मॉलिनक्स, मेगन शुट, टायला व्लेमिंक, डार्सी ब्राउन, अलाना किंग, अलाना किंग, , किम गर्थ