फोटो सौजन्य – Youtube (Sony Sports Network)
टिम इंडियाचा झालेला इंग्लडविरुद्ध सामन्यामध्ये इंग्लडच्या खेळाडूंनी केलेले कृत्य सध्या जगभरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यावर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक क्रिकेट तज्ञांनी देखील त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चर्चेत आहे. त्याने या चौथ्या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये धुव्वाधार कामगिरी केली. त्याने शतक आणि ५ विकेट घेण्याचा दुहेरी पराक्रम केला. पण त्याहूनही अधिक, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना शतकापासून वंचित ठेवण्यासाठी त्याने केलेल्या युक्तीची बरीच चर्चा आहे.
संजय मांजरेकर यांनी त्याच्या वागण्याची तुलना एका बिघडलेल्या मुलाशी केली आहे, तर आर. अश्विन यांनी त्याच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही बेन स्टोक्सवर टीका केली आहे. जडेजा आणि सुंदर यांना शतकापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नाही, तर त्याच्या बढाईखोरपणा आणि ढोंगीपणाबद्दल. लीड्स येथील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बेन स्टोक्सने अभिमानाने सांगितले की, जरी भारताने ६०० धावांचे लक्ष्य दिले असते तरी आम्ही विजयासाठी खेळलो असतो. पहिल्या कसोटीत भारताने चौथ्या डावात इंग्लंडला ३७२ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने ५ विकेट गमावून साध्य केले.
योगायोगाने, बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ६००+ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर इंग्लंडच्या काही खेळाडूंनी म्हटले होते की भारत घाबरला आहे, म्हणून त्यांनी ६००+ धावांच्या आघाडीनंतर डाव घोषित केला. फक्त एका सामन्यानंतर, इंग्लंडचा ‘आम्ही ६०० धावांचे लक्ष्य दिले तरी…’ हा ‘आत्मविश्वास’ फसवा ठरला. भारताने ३३६ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
IND VS ENG Test : जसप्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार? गौतम गंभीरं दिले अचूक उत्तर
सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या कर्णधाराच्या बढाईखोरपणा आणि ढोंगीपणावर हल्ला चढवला आणि सोनी स्पोर्ट्सवर म्हटले की जर ते शुभमन गिलच्या जागी असते तर त्यांनी स्टोक्सला काही अस्वस्थ करणारे प्रश्न नक्कीच विचारले असते. ते म्हणाले, ‘प्रश्न विचारता येतात – इंग्लंडने खूप वेळ फलंदाजी केली का? त्यांनी डाव लवकर घोषित करायला हवा होता का? जेव्हा भारताने बर्मिंगहॅममध्ये ६०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली तेव्हा इंग्लंडच्या काही खेळाडूंनी पत्रकार परिषदेत म्हटले होते – भारत घाबरला होता म्हणून त्यांनी आम्हाला ६०० धावा दिल्या. पण मला आठवते की मी आधी कुठेतरी वाचले होते की त्यांनी आम्हाला ६०० धावा द्या, आम्ही काहीही पाठलाग करू शकतो. भारताने असेच काहिसे केले आणि इंग्लडचा संघ ३३६ धावांनी पराभव झाला.