भारताने झिम्बाब्वे (India Vs Zimbabwe) विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतील सलग तिसरा सामना जिंकत विजयी पताका फडकावली आहे. २२ ऑगस्ट रोजी झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर १३ धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताने झिम्बाब्वे विरुद्ध ३-० अशी आघाडी घेतली.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी ७९ चेंडूत ५० धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या ६३ वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल ४६ चेंडूत ३० धावा करून माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलने इशान किशनसोबत १४० धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला.
शुभमन गिलने ८२ चेंडूत त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. या सामन्यात भारताने ५० षटकात आठ विकेट्स गमावून २८९ धावा केल्या. दरम्यान, झिम्बाब्वेच्या ब्रॅडली इवांसनं जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने १० षटकात ५४ धावा खर्च करून भारताच्या ५ फलंदाजांना माघारी धाडले.
That's that from the final ODI.
A close game, but it was #TeamIndia who win by 13 runs and take the series 3-0 #ZIMvIND pic.twitter.com/3VavgKJNsS
— BCCI (@BCCI) August 22, 2022
२९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. त्यांचे सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन ४५ धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदरने पुढे डाव कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पण ४९ व्या षटकात सिकंदर ११५ धावा करुन बाद झाला. त्याने ९५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असे वाटत असताना आवेशने अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत झिम्बाब्वेचा डाव २७६ धावांवर रोखत भारताला १३ धावांनी विजयी करुन दिले.
भारतीय संघ तब्बल सहा वर्षांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असून या दौऱ्यात भारतीय संघात नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली होती. तर कर्णधार पदाची धुरा के एल राहुल आणि उपकर्णधार पदाची धुरा शिखर धवन याच्याकडे होती.