इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. या स्पर्धेत भारतानंने २२ सुवर्णपदक, १६ रौप्यपदक आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकांची कमाई केली आहे.
शनिवारी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी पदक जिंकलेल्या भारतीय बॉक्सर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास भेटवस्तू दिली.
वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता स्टार बॉक्सर निकांत झरीन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व बॉक्सर्सनी स्वाक्षरी केलेलं बॉक्सिंग ‘ग्लोव्हज’ भेट दिले आहे. या क्षणाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “आपल्या माननीय पंतप्रधानांना सर्व मुष्टिरक्षकांनी स्वाक्षरी केलेले बॉक्सिंग ग्लोव्हज भेट देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदी सर या अप्रतिम संधीबद्दल धन्यवाद. देशाला अभिमान वाटणाऱ्या माझ्या सहकारी खेळाडूंसोबत एक उत्तम दिवस घालवला.”
Honoured to gift the boxing gloves signed by all the pugilists to our honorable Prime Minister @narendramodi sir. Thank you for this amazing opportunity.?
A great day spent with my fellow athletes who have made the country proud. ?? pic.twitter.com/A0YtlOujUA
— Nikhat Zareen (@nikhat_zareen) August 14, 2022