फोटो सौजन्य - BCCI
चॅम्पियन ट्रॉफी : २०२५ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे (Champion Trophy 2024) आयोजन आयसीसीने केले आहे. परंतु या चॅम्पियन ट्रॉफीचे सामने कुठे होणार? कधी होणार यासंदर्भात अजूनपर्यत आयसीसीने कोणत्याही प्रकराची माहिती दिलेली नाही. परंतु पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने पाकिस्तानमध्ये (Pakistan Cricket Board) चॅम्पियन ट्रॉफीची तयारी सुरु केली आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने चॅम्पियन ट्रॉफीची तयारी केली आहे आणि भारतीय क्रिकेट संघाचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय संघाचे सामने आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक आयसीसीकडे सादर केले आहे. परंतु अजुनपर्यत कोणत्याही क्रिकेट बोर्डने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
मीडियाच्या माहितीनुसार आता एका गोष्टीवर पूर्णविराम मिळाला आहे की, भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमी आहे कारण बीसीसीआयने (BCCI) यासंदर्भात आयसीसीकडे मागणी केली आहे. एएनआयच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, हे सामने पाकिस्तानला न होता दुबई किंवा श्रीलंका येथे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भारताचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
पण जय शाह यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे. याआधी जय शाह यांनी आशिया चषकाच्या वेळी भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे त्यावेळचे सामने हे श्रीलंका आणि दुबईमध्ये आयोजित केले होते. त्यामुळे या घटनेवर बीसीसीआयचा अधिकृत निर्णय काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
सध्या भारताचा संघ झिंबाब्वेविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेविरुद्ध पहिला सामना गमावला होता. त्यानंतर सलग दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आघाडी घेतली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मागील दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.