IPL 2025 : पहिल्याच सामन्यात होणार घमासान; जिंकण्याच्या इराद्याने हे दोन संघ उतरणार मैदानात...(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : चॅम्पियन ट्रॉफीचा थरार संपला असून आता जगभरातील खेळाडू इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 22 मार्च आयपीएलच्या 18व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हंगामातील आयपीएलचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात २२ मार्च रोजी होणार आहे. हा सामना ऐतिहासिक मैदान ईडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. शिवाय, शिवाय 25 च्या अंतिम सामन्याचा निकालही याच मैदानावर लागणार आहे.
आयपीएल 2025 मध्ये केकेआर आणि आरसीबी यांच्यात पहिल्यांदाच भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सज्ज झाले आहे. त्यामुळेच आतापासून केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्याची तिकिटे विकली जात आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील पहिला आयपीएल 2025 सामना 07:30 वाजता सुरू होणार आहे. अगदी अर्धा तास आधी म्हणजेच नाणेफेक 7 वाजता होणार आहे. उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल.
हेही वाचा : भारतीय क्रिकेट जगतात शोककळा; पदार्पणातच धमाका उडवणाऱ्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन…
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना कोलकाता येथील ऐतिहासिक मैदान ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बीसीसीआय आयपीएलच्या उद्घाटनात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. IPL 2025 मध्ये बॉलीवूड आणि सध्याचा काळ यावर चर्चा होत आहे. पण अद्याप बीसीसीआयने हे निश्चित केलेले नाही की उद्घाटन समारंभात कोण कोण स्टार्स परफॉर्म करणार आहेत.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, आणि यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी






