भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनल(फोटो-सोशल मीडिया)
Ravichandran Ashwin : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला एक दिवस बाकी असतानाच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला एका खास सन्मानाने गौरवण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी अश्विनला हा खास मान मिळाला आहे. अश्विन या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. 23 मार्च रोजी होणाऱ्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात अश्विन मैदानात उतरणार आहे. त्याआधी अश्विनच्या गावातील एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. जो एक सन्मान मनाला जात आहे. याच वर्षी अश्विनला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन हा प्रतिष्ठित खेळाडूंच्या रांगेत सामील झाला आहे. ज्यांच्या गावी रस्त्याला त्यांची नाव देण्यात आली आहेत. अश्विनला शुक्रवारी हा सन्मान देण्यात आला आहे. महापौरांकडून रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
शुक्रवारी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन कौन्सिलच्या बैठकीमध्ये महापौर आर प्रिया यांनी चेन्नईच्या कोडंबक्कम येथील रामकृष्णपुरम स्ट्रीटचे नाव बदलून ‘रविचंद्रन अश्विन स्ट्रीट’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. कॅरम बॉल इव्हेंट्स आणि मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सीओओ आर. कार्तिकच्या विनंतीनंतर हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
मागील वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. अश्विनने भारतीय संघासाठी सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत छाप पाडली आहे. अश्विनने आपल्या गोलंदाजीने अनेक विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम रचले आहेत. अश्विन 2011 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा देखील सदस्य होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये देखील निर्णायक षटक टाकून अंतिम फेरी जिंकणारा तो खेळाडू ठरला आहे. तसेच याशिवाय चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहून त्याने आयपीएलचे विजेतेपदही आपल्या नावे केले आहे.
मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने अश्विनवर बोली लावत त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. तो पुन्हा एकदा चेन्नईसाठी जडेजासोबत गोलंदाजी करताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ हा पाच वेळा आयपीएल विजेता संघ ठरला आहे. अशा स्थितीत दिग्गजांचे पुनरागमन झाल्याने संघ अधिक मजबूत झाला असून सहाव्या विजेतेपदासाठी सीएसके प्रयत्नशील असेल. अश्विन 2008 ते 2015 साला पर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.