राजस्थान रॉयल्सची घोडदौड सुरू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आयपीएलचा सीझन सुरू झाल्यापासूनच राजस्थान रॉयलने सर्व सामन्यांवर आपले वर्चस्व राखले आहे आणि प्रत्येक सामान्यात वैभव सूर्यवंशीचा मोठा वाटा आहे. पण याशिवाय यशस्वी जयस्वाल आणि रवी बिष्णोईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या संघातील प्रत्येकाने यावर्षी कमालीचा खेळ केला आहे. यामुळेच तिन्ही सामने जिंकून या हंगामावर सध्या राजस्थान रॉयलने आपला डंका वाजवला आहे. चला, गुणतालिकेवर एक नजर टाकूया.
MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी
राजस्थान रॉयल्स ३ विजय आणि ३ रद्द झालेल्या सामन्यांसह ६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स ३ विजय आणि १ रद्द झालेल्या सामन्यासह ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २ विजय आणि २ रद्द झालेल्या सामन्यांसह ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स २ विजय आणि २ रद्द झालेल्या सामन्यांसह ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
सनरायझर्स हैदराबाद ३ सामन्यांत १ विजय आणि २ पराभवांसह २ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. एलएसजी २ सामन्यांत १ विजय आणि १ पराभवासह २ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स ३ सामन्यांत १ विजय आणि २ पराभवांसह २ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. कोलकाता नाइट रायडर्स ३ सामन्यांत २ पराभव आणि एका रद्द झालेल्या सामन्यातील १ गुणासह २ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने आपले दोन्ही सामने गमावले असून ते नवव्या स्थानावर आहेत, तर सीएसके तीन सामने गमावल्यानंतर दहाव्या स्थानावर आहे. समान गुण असूनही, गुणतालिकेतील संघांची क्रमवारी रनरेटच्या आधारावर ठरवली जाते.
ऑरेंज आणि पर्पल कॅपवरसुद्धा RR च्या खेळाडूंचा कब्जा
मंगळवारी बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध ३२ चेंडूंमध्ये ७७ धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या सलामीवीर यशस्वी जैस्वालने आता ऑरेंज कॅप पटकावली आहे. जैस्वालने तीन सामन्यांतील तीन डावांमध्ये १७० धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा समीर रिझवी दोन सामन्यांत १६० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
बुधवारी, दिल्ली कॅपिटल्सचा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्सशी होईल. या सामन्यात रिझवी जैस्वालला मागे टाकू शकतो. राजस्थान रॉयल्सच्या रवी बिश्नोईकडे पर्पल कॅप आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन बळी घेणाऱ्या बिश्नोईच्या नावावर आता तीन सामन्यांत सात बळी आहेत.






