ग्लेन मॅक्सवेल(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2026 Retention : आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या पंजाब किंग्जने आगामी मिनी-लिलावापूर्वी काही महत्त्वाचे पाऊल उचलेले आहेत. फ्रँचायझीने जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या दिग्गजांसह पाच प्रमुख खेळाडूंना रिलीज केले आहे. अलिकडच्या हंगामात मॅक्सवेलची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. ज्यामुळे त्याची सुटका करणे समजण्यासारखे असले तरी फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन स्टार यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिसला देखील सोडचिठ्ठी दिली आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, त्याची गेल्या हंगामापर्यंत इंग्लिसची कामगिरी चांगली राहिली होती.
हेही वाचा : IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फ्रँचायझीने आगामी हंगामापूर्वी इंग्लिस आणि मॅक्सवेलला का सोडले असावे? तर मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले आहे. पॉन्टिंग म्हणाला की, इंग्लिसला सोडण्याचा निर्णय त्याच्या कामगिरीवर नव्हे तर उपलब्धतेवर घेण्यात आला आहे.
पॉन्टिंग पुढे म्हणाला, “जोश (जोश इंग्लिस) हा एक उत्तम खेळाडू असून आम्हाला त्याला कायम ठेवायचे होते. परंतु, तो या वर्षीच्या बहुतेक स्पर्धेत उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे त्याला कायम ठेवणे खूप कठीण झाले असते.” पॉन्टिंगच्या मतावरून एक गोष्ट स्पष्ट होते की फ्रँचायझीकडून इंग्लिसबाबत घेतलेला निर्णय जाणूनबुजून नाही तर जबरदस्तीने घेण्यात आला आहे. हा आगामी हंगामासाठी संघाचा धोरणात्मक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : IND vs SA : भारताच्या अडचणी वाढल्या, शुभमन गिल आयसीयूमध्ये एडमिट! जाणून घ्या कशी आहे कर्णधाराची तब्येत?
मॅक्सवेलबद्दल पॉन्टिंग काय म्हणाला?
मॅक्सवेलला सोडण्याच्या निर्णयावर बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, “मॅक्सवेल हा एक अद्भुत क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे खेळाचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. परंतु मागील हंगामात, आम्ही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरलो आहेत. सध्याचे खेळाडू आणि आगामी हंगाम लक्षात घेता, तो आमच्या सुरुवातीच्या इलेव्हनचा भाग असेल असे आता आम्हाला वाटत नाही. म्हणूनच त्याला सोडण्याचा सुरुवातीचा निर्णय योग्य वाटत आहे.”






