फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Vaibhav Suryavanshi Half Century : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरात च्या संघाने पाहिलं फलंदाजी करत दमदार फलंदाजी केली पण आता दुसऱ्या डावांमध्ये राजस्थानच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा आणि आयपीएच्या इतिहासातील सर्वात तरुण १४ वर्षीय खेळाडूने आज आयपीएल २०२५ चे सर्वात जलद गतीने अर्धशतक झळकावले आहे. वैभव सूर्यवंशी याने आज १७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर वैभव सूर्यवंशी याने आज त्यांच्या करियरचे आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकवले आहे. वैभव सूर्यवंशी याने आज संघासाठी फक्त १७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ षटकार आणि ३ चौकार मारले. त्याच्या या फलंदाजीने सर्वानाच चकित केले. आज जेव्हा त्याचे अर्धशतक झाले तेव्हा राजस्थानच्या सर्व प्रशिक्षकानै त्याचबरोबर स्टेडियममध्ये असलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांनी त्याचे उभे राहून कौतुक केले. अर्धशतक झळकावून तो अजूनही मैदानावर नाबाद खेळत आहे.
“Aisa kabhi hua hai, aapne pehle hi ball pe chakka maara ho?”
This is what our young Vaibhav asked his teammate a few days before he made his debut on the big stage, smashing a six off the first ball he faced.
He then cried on his way back to the dugout, having scored 34 (20)…
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 28, 2025
राजस्थान रॉयल्सने यंदा मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशीला १.१० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यांमध्ये संजू सॅमसन याला चालू सामन्यात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुढील सामान्यांपासून वैभवला संघामध्ये स्थान दिले आणि त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.