कर्नाटक हायकोर्टाची सरकारला नोटीस (फोटीओ- सोशल मिडिया )
बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. बुधवारी या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी संघ बंगळुरूला रवाना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आता कर्नाटक हायकोर्टाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.
बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला नोटिस बजावली आहे. हायकोर्टाचे या प्रकरणाची दाखल घेत सरकारला नोटीस बजावली आहे. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसंघाच्या विजयी रॅलीदरम्यान विविध प्लॅटफॉर्मवर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू आणि 75 चाहते जखमी झाले आहेत.’
वरिष्ठ वकील म्हणाले, “विधानसभा आणि स्टेडियमवर दोन कार्यक्रम पार पडले. रूग्णवाहिक कुठे तैनात करण्यात आल्या होत्या ते त्यांनी सांगावे.’ “या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी आणि असे प्रकार भविष्यात होऊ नयेत यासाठी यासाठी आम्हाला अनेक पत्रव्यवहार प्राप्त झाले आहेत. आम्ही राज्य सरकारला नोटिस बजावतो, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला चेंगराचेंगरी प्रकरणात नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार?
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण या आनंदाला गालबोट लागलें आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच, हा उत्साह चाहत्यांसाठी जिवावर बेतला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन १० लोकांचे जीव गेला आहे. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या सर्व घटनेवर बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले, ” रॉयल चॅलेंजर्सच्या संघाच्या विजयी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. ५ हजारांपेक्षा जास्त पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते. मी पोलिसांना दोष देणार नाही. घडलेल्या दुर्घटनेबद्दल मी सर्वांची माफी मागतो.”
हे कसले सेलिब्रेशन?
आज आरसीबीचा संघ आपल्या होमपीचमध्ये दाखल झाला. तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीचे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी सोशल आयोजित करण्यात आला होता. मात्र ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर येण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी झाली होती.