फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेमध्ये करुण नायर भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पहिल्या सामन्यात तो फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याल पहिल्या दोन सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती पण तो दोनही सामन्यांमध्ये फेल ठरला टीम इंडियासाठी मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. त्याला चौथ्या सामन्याच्या प्लेइंग ११ मधुन वगळले होते, यावेळचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.
करुण नायरचा केएल राहुलसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचं सत्य सांगितलं आहे. करुण नायर आणि केएल राहुल यांचा चौथ्या सामन्याच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडीओमध्ये सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि करुण नायर हे दोघे सामना सुरु असताना बाल्कनीमध्ये बसलेले होते. या व्हिडीओमध्ये यावेळी असे दिसत आहे की करुण नायर हा केएल राहुलला काही तरी सांगत आहे आणि तो रडताना दिसत आहे. यावर आता करुण नायरने मोठा खुलासा केला आहे.
Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
करुण नायर याने दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की तो व्हिडिओ फेक आहे. तो व्हिडिओ एआय पद्धतीने बनवलेला आहे. पुढे त्याने सांगितले की हो आम्ही बाल्कनीमध्ये बसलो आहोत, पण त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जे काही घडले आहे ते सत्या नाही आहे. तो पुढे म्हणाला की मला फार आनंद झाला की मी, केएल राहुल आणि प्रसिद्ध कृष्णा हे माझ्यासोबत होते त्याच्यासोबत मला जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली.
🚨INSIDESPORT EXCLUSIVE🚨
KARUN NAIR WARNS EVERYONE ABOUT FAKE AI VIDEOS ABOUT HIS RETIREMENT 😡#CricketTwitter pic.twitter.com/vMRysxX6SP
— InsideSport (@InsideSportIND) August 11, 2025
तथापि, त्याच्या कामगिरीतून कसोटी संघात परतण्याची त्याची भूक दिसून आली नाही. त्या दौऱ्यात नायरने फक्त एक अर्धशतक झळकावले. तेही मालिकेतील शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात. दुसऱ्या डावातही त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. आता मालिका संपली आहे, त्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीत पुन्हा संधी मिळण्याबाबत अनिश्चितता त्याच्यावर घोरली आहे. या अनुभवी फलंदाजाने स्वतः कबूल केले की त्याने ओव्हलमध्ये केलेल्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करायला हवे होते, परंतु ते करू न शकल्याने तो निराश आहे.