KKR प्लेऑफसाठी पात्र : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या (Indian Premier League 2024) 60 व्या सामन्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात फक्त 16 षटकांचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताच्या संघाने 16 षटकांमध्ये 157 धावा केल्या. परंतु मुंबई संघाला प्रतिसादात फक्त 139 धावाचं करता आल्या. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा कोलकाता नाइट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे. शनिवारी त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर झालेल्या पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला.
[read_also content=”जोस बटलर सुद्धा आहे माहीचा फॅन, व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/sports/jos-buttler-is-also-a-fan-of-mahi-video-goes-viral-532394.html”]
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 2021 हंगामानंतर प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेचा विचार करता कोलकाता नाइट रायडर्सने 12 सामन्यांमध्ये 9 विजय नोंदवले आहेत आणि आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. चालू मोसमात कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी सातत्यपूर्ण आहे. गेल्या मोसमात सातव्या स्थानावर असलेल्या केकेआरसाठी मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीरचे पुनरागमन हा मोठा फायदा होता. कोलकाताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत.
Shathe cholo #KnightsArmy…pi?ture abhi baaki hai! ? pic.twitter.com/V6jpFBCZYO
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 11, 2024
एक सामना जिंकल्यास त्यांचे टॉप-2 मध्ये स्थान निश्चित होईल आणि प्लेऑफमध्ये केकेआर संघ थेट पहिला क्वालिफायर खेळेल. अशा स्थितीत केकेआरला अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी असतील. पुढील दोन सामन्यांत किमान एक विजय नोंदवण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. कोलकाताचे पुढील सामना गुजरात टायटन्ससोबत आहे आणि शेवटचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत असणार आहे.