फोटो सौजन्य – BCCI
ऋषभ पंत : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा काल शुभारंभ झाला आहे यामध्ये भारताच्या संघाने दमदार सुरुवात करून पहिल्याच दिनी 359 धावा केल्या आहेत. कालच्या दिवसांमध्ये भारताच्या संघासाठी फक्त एकच वाईट गोष्ट ठरली ती म्हणजेच टीम इंडियात पदार्पण करणारा साई सुदर्शन हा एकही धाव न करता बाद झाला. त्या व्यतिरिक्त भारताच्या संघाने दोन शतक त्याचबरोबर केएल राहूल नाही 42 धावांची खेळ खेळली त्याचबरोबर भारताचे उपकर्णधार ऋषभ पंत देखील 65 धावांची खेळी खेळून नाबाद आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या बाजूने गेला.
लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 3 विकेट गमावून 359 धावा केल्या. ऋषभ पंत 65 धावांवर नाबाद राहिला. ऋषभ पंतने दिवसाचा शेवट त्याच शैलीत केला ज्या पद्धतीने त्याने आपला डाव सुरू केला होता. जेव्हा जेव्हा दिवसाची शेवटची षटक असते तेव्हा प्रत्येक फलंदाज विकेट देणे टाळू इच्छितो आणि शक्य तितके कमी धोकादायक शॉट्स खेळतो. पण पंत हा पंतच असतो. ख्रिस वोक्सच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने पायांचा वापर करून षटकार मारला. त्याचा पराक्रम पाहून इंग्लंडमधील प्रत्येक खेळाडू आश्चर्यचकित झाला.
ENG vs IND : भारताच्या नव्या युगाचे केलं ‘शुभ’ आगमन, कर्णधार शुभमन गिलने शतक ठोकून रचला इतिहास
रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थित भारताच्या संघाने कमालीचा खेळ दाखवला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, शुभमन गिल आणि ऋषभ पंतची जोडी ड्रेसिंग रूममध्ये परतली तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यादरम्यान, पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या केएल राहुलने ऋषभ पंतला पाहताच त्याच्यासमोर हात जोडले. त्याला हे देखील माहित आहे की ऋषभ पंतने जे केले आहे ते दुसरे कोणीही करू शकत नाही. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
3⃣0⃣0⃣0⃣ runs in Test cricket and counting 🙌 Half-century for vice-captain Rishabh Pant 👏👏 Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/CdPNDrrBGJ — BCCI (@BCCI) June 20, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय संघाला यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ९१ धावा जोडल्या. तथापि, शानदार फलंदाजी करणारा केएल राहुल २५ व्या षटकात ४२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर ब्रायडन कार्सचा बळी ठरला. यानंतर, पदार्पण करणारा साई सुदर्शन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.






