सध्या सोशल मीडियामुळे क्रिकेटस्टारच्या कोणत्याच गोष्टी आपल्यापासून लपून राहत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला क्रिकेटस्टार ऋषभ पंत बद्दल माहित नसलेल्या तीन गोष्टी सांगणार आहोत.
१. ऋषभची गाड्यांची आवड :
तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु क्रिकेटपटू ऋषभ पंत याला गाड्यांची फार आवड आहे. ऋषभच्या गॅरेजमध्ये अनेक आकर्षक आणि आलिशान गाड्या पार्क केलेल्या आहेत. एका मुलाखतीत ऋषभने सांगितले होते की, त्याला नेहमीच i20 ही त्याची पहिली कार बनवायची होती. तो म्हणाला माझ्याकडे 100 कोटी रुपये असले तरीही मी तीच कार खरेदी करेन. अखेर जेव्हा क्रिकेट खेळून त्याने पैसे कमावले तेव्हा तो प्रशिक्षक देवेंद्र शर्मा यांच्यासोबत त्याची आवडती कार खरेदी करण्यासाठी गेला होता. ऋषभ आपल्या आवडत्या कारबद्दल बोलताना म्हणतो, “माहित नाही का पण मला ती कार फार आवडते, मी कदाचित त्यातून कधीकाळी प्रवास केला असेल तर आठवत नाही, पण मला एवढेच माहित होते की i20 हीच माझी पहिली कार असेल”. I २० सह ऋषभ पंतच्या ताफ्यात सध्या ऑडी ए8, मर्सिडीज बेंझ सी-क्लास, फोर्ड मुस्टँग आणि मर्सिडीज जीएलई या गाड्यांचा समावेश आहे.
2. उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर
ऋषभ पंत हा युवा क्रिकेट स्टार उत्तराखंड राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना ! खरतर उत्तराखंड मधील रुरकी हे ऋषभ पंतचे मूळ गाव आहे. मागच्या यावर्षी डिसेंबर महिन्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषभची उत्तराखंडच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषणा केली. उत्तराखंडातील युवकांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऋषभच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
३. ऋषभ पंत पूर्वी राजस्थान संघातून खेळायचा
होय, ऋषभ सध्या देशांतर्गत क्रिकेट दिल्ली येथून खेळत असला तरी तो कधी काळी देशांतर्गत क्रिकेट मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी राजस्थानला गेला होता . ऋषभ पंतचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी त्याला क्रिकेटच्या चांगल्या संधींसाठी आपला तळ राजस्थानला हलवण्याचा सल्ला दिला होता. प्रतिभावान ग्लोव्हजमनने असेच केले आणि अंडर-14 आणि अंडर-16 स्तरांवर राजस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र ऋषभ पंतला बाहेरचा खेळाडू असल्याने राजस्थान कॅम्पमध्ये भेदभावाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यासाठी तो पुन्हा लवकरच दिल्लीला परतला होता. त्यानंतर त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. या डायनॅमिक फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संघासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. 2016-17 च्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याने गौतम गंभीरच्या जागी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती.