फोटो सौजन्य - KolkataKnightRiders
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे, या सामन्याचा पहिला डाव संपला आहे आणि यामध्ये केकेआरच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांची बत्ती गुल केलेली दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सला कोलकाता नाईट राइडर्सने 104 धावांवर रोखले आहे. चेन्नईचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले आहेत कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
आजची कामगिरी पाहून चेन्नई सुपर किंग्सचे प्ले ऑफमध्ये जाणे कठीण होणार आहे. तर मागील चार सामन्यांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजांनी निराशा जनक कामगिरी केली या कामगिरीची सत्र या सामन्यातही सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सलामी वीर फलंदाज रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉन्वे या दोघांचेही लवकर विकेट गमावली. रचिन रवींद्रने ९ चेंडूंमध्ये चार धावा केल्या तर कॉन्वे १२ धावा करून मोईन अलीने संघाला बाहेरचा रस्ता दाखवला. राहुल त्रिपाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात सामील करण्यात आले होते पण तो सुद्धा धावा करण्यात फेल झाला.
He picks wickets ☝ He takes blinders 👏
🎥 A brilliant catch from Varun Chakaravarthy 💪
Vaibhav Arora too joins the wickets tally 🔥
Updates ▶ https://t.co/gPLIYGiUFV#TATAIPL | #CSKvKKR | @KKRiders | @chakaravarthy29 pic.twitter.com/BIFVCiYo4Z
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
विजय शंकरने २१ मध्ये २९ धावा केल्या, रविचंद्रन अश्विनची बॅट शांत राहिली तो एक धाव करून हर्षद राणाने त्याला पवेलियनचा रस्ता दाखवला. रवींद्र जडेजा सुद्धा काही विशेष कामगिरी करू शकला नाही. दीपक बुद्धाला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील करण्यात आले होते पण तो चार चेंडू खेळून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्स चा महान फलंदाज महेंद्रसिंग धोनी सुद्धा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विशेष कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल तर सुनील नरेनने संघासाठी ३ विकेट घेतले. त्याने राहुल त्रिपाठी, रवींद्र जडेजा आणि धोनी हे मोठी विकेट नावावर केले. हर्षित राणा आणि वरून चक्रवर्तीने संघासाठी प्रत्येकी दोन विकेट घेतले. वैभव अरोडा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आज कौतुकास्पद कॅप्टन्सी दाखवली आहे. त्याने आज फिरकी गोलंदाजांचा जास्त उपयोग केला आणि संघाला त्याचा फायदा झाला. कोलकाताचा संघ या स्पर्धेच्या विजयाच्या शोधात आहे. मागील झालेल्या पराभवानंतर कोलकाताने या स्पर्धेमध्ये दमदार कमबॅक केला आहे.