फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कुलदीप यादवची सोशल मीडिया पोस्ट : आयपीएल क्रेझ फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आहेत. आयपीएलच्या ऑक्शनपासून ते स्पर्धेच्या स्फोटक फलंदाजीपर्यत सगळेचजण आयपीएल आवडीने पाहतात. आयपीएल ऑक्शनमध्ये फ्रँचायझी खेळाडूंवर करोडोंची बोली लावतात. मुंबई इंडियन्सचा संघ आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ हे या दोघांनी आतापर्यत आयपीएलच्या पाच ट्रॉफी प्रत्येकी जिंकल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशा संघांपैकी एक आहे ज्याने एकदाही विजेतेपद पटकावलेले नाही. हा संघ तीन वेळा फायनल खेळला, पण तिन्ही वेळा पराभूत झाला.
आरसीबीचे चाहते नेहमीच उत्साहात असतात, त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला नेहमीच सपोर्ट करत असतात. फक्त संघालाच नाही तर टीममधील खेळाडूंना देखील ते तेवढेच प्रेम देत असतात. पण अजुनपर्यत आरसीबीने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. पण टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवने आरसीबी आणि त्याच्या चाहत्यांची तार पूर्णपणे ओढली. यूट्यूब चॅनलवर बोलत असलेल्या कुलदीपला आरसीबीच्या एका चाहत्याने काही सांगितले, तेव्हा भारतीय फिरकीपटू गप्प बसू शकला नाही आणि चाहत्यांना दुखावणारे काहीतरी बोलले. त्यानंतर कुलदीपला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले.
Kuldeep Yadav to a Rcb fan
” You don’t need a Goalkeeper, you need to win IPL Trophy brother ” 😭 pic.twitter.com/avTiEuaM9Q
— 𝙼𝚛.𝚅𝚒𝚕𝚕𝚊 (@Shivayaaah) January 24, 2025
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या कुलदीपने पुन्हा एक पोस्ट टाकून पुन्हा एकदा आरसीबीच्या चाहत्यांचा भडिमार केला. यूट्यूब लाइव्ह दरम्यान, एका आरसीबी चाहत्याने कुलदीपबद्दल टिप्पणी केली की त्याने फ्रेंचायझीमध्ये सामील व्हावे आणि गोलकीपर व्हावे. त्याला उत्तर देताना कुलदीप म्हणाला, तुला ट्रॉफी हवी आहे, गोलरक्षक नाही भाऊ.
यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी कुलदीपला घेरले आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, कुलदीप इथेच थांबला नाही. त्याने आणखी एक पोस्ट केली ज्यानंतर आरसीबीचे चाहते संतापले आहेत. कुलदीपने लिहिले, “चिल मॅन आरसीबी फॅन्स, ट्रॉफी तुमची आहे. पण मी गोलरक्षक नाही.” ही त्याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Chill yar rcb fans…
Trophy apki hai 🏆🙌🏻
Par me goal keeper ni hu 😂— Kuldeep yadav (@imkuldeep18) January 24, 2025
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. अनेक संघाच्या कर्णधारांनी त्यांचे संघ सोडले आहे. आयपीएल २०२४ चा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघ सोडला आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर आयपीएल २०२५ सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आयपीएल २०२५ मध्ये दिसेल. तर केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल.