क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन (Photo Credit- X)
Legendary Umpire Dickie Bird Passes Away: इंग्लंडमधून आलेले क्रिकेट जगतातील महानतम अंपायर हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड (Dickie Bird) यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी याच क्लबसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. यॉर्कशायर व्यतिरिक्त डिकी बर्ड यांनी लीसेस्टरशायरसाठी देखील काउंटी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. क्रिकेटमध्ये येण्याआधी बर्ड फुटबॉल खेळत होते, पण नंतर त्यांनी क्रिकेटकडे लक्ष दिले आणि क्रिकेटच्या जगात ते महान अंपायरांपैकी एक बनले.
हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांच्या निधनाची बातमी देताना यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने म्हटले की, “अत्यंत दुःखाने यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब क्रिकेटच्या सर्वात प्रिय व्यक्तींपैकी एक असलेल्या हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड एमबीई ओबीई यांच्या निधनाची घोषणा करत आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे घरी शांतपणे निधन झाले.
It is with profound sadness that The Yorkshire County Cricket Club announces the passing of Harold Dennis “Dickie” Bird MBE OBE, one of cricket’s most beloved figures, who died peacefully at home at the age of 92. — Yorkshire CCC (@YorkshireCCC) September 23, 2025
यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबमधील सर्वांच्या संवेदना या कठीण काळात डिकी यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आहेत. त्यांनी येथे सर्वांच्या पाठिंब्यासाठी खूप वेळ घालवला, त्यामुळे त्यांची सर्वांना खूप आठवण येईल आणि यॉर्कशायरच्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणून त्यांची कायम आठवण ठेवली जाईल.”
IND VS PAK : ‘त्याला IPL मध्येही पंचगिरी…’, फखर झमानच्या बाद होण्यावर शाहिद आफ्रिदीने ओकली गरळ
आपल्या अंपायरिंग करिअरमध्ये हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांनी ६६ कसोटी आणि ६९ वनडे सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. या काळात त्यांनी ३ विश्वचषकांमध्येही अंपायरची भूमिका बजावली.
१९९६ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांनी शेवटचे अंपायरिंग केले होते. याच सामन्यातून राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मैदानावरील त्यांच्या योग्य वागणूक आणि अचूक निर्णयामुळे सर्व संघ त्यांचा खूप आदर करत असत. १९७१ मध्ये हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांनी त्यांच्या अंपायरिंग कारकिर्दीची सुरुवात केली होती.