फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Gujarat Titans 1st innings report : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. सामनाच्या सुरुवातीलाच लखनऊच्या संघाला मोठा धक्का बसला आणि फॉर्ममध्ये असलेला खेळाडू मिचेल मार्श या सामन्यातून आज बाहेर आहे. त्यामुळे लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गुजरातच्या संघामध्ये वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळाली आहे. या सामन्यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सने पहिले फलंदाजीचा आव्हान स्वीकारत लखनऊसमोर 181 धावांचे आव्हान उभे केले आहे.
गुजरात टायटनच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी संघाला कमालीची सुरुवात करून दिली होती. गुजरात टायटन्सचा फलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर संघाचे सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी संघासाठी धुव्वादार फलंदाजी केली. शुभमन गिलने संघासाठी ३८ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. यामध्ये त्याने एक षटकार आणि सहा चौकार मारले. तर साई सुदर्शनचे या सीझनमध्ये आणखी एक शतक झळकावले आहे. त्याने लखनऊ विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ३७ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले.
Innings Break!
A brilliant comeback by the home side bowlers 👏
That leaves #LSG to get 1⃣8⃣1⃣ runs for the 𝗪 🎯
Scorecard ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/W9ArpvzBOe
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
शेरफेन रदरफोर्ड हा या सामन्यात फेल ठरला त्याने या सामन्यात १९ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. राहुल तेवतियाला पहिल्याच चेंडूवर शार्दूल ठाकूरने बाहेरचा रस्ता दाखवला. शाहरुख खानने संघासाठी ६ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या आणि नाबाद राहिला.
आजचे सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती पण तो संघासाठी विशेष कामगिरी करू शकला नाही. तो दोन धावा करून रवी बिश्नोईने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजानाबद्दल सांगायचे झाले तर १० ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सने एकही विकेट गमावला नव्हता पण त्यानंतर रवी बिष्णोईने २ विकेट्स नावावर केले तर दिग्वेश सिंह, आवेश खान आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
LSG Vs GT सामन्याआधी गुजरातला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू जखमी आणि आयपीएल 2025 मधून बाहेर!
आज लखनौ सुपर जायंट्स मुख्य फलंदाज मिचेल मार्श संघामध्ये नाही त्यामुळे एडन मार्करमसोबत कोण सलामी देणार हे पाहणं महत्वाच ठरेल. त्याचबरोबर संघाचा कर्णधार रिषभ पंत सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आज तो कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. निकोलस पुरण आणि ऑरेंज कॅप होल्डर सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज त्याच्या बॅटमधून किती धावा येतात हे पाहणं मनोरंजक ठरेल.