Rishabh Pant : २७ कोटींचा ऋषभ पंत, क्रिकेटच नाही तर गुंतवणूक करण्यातही आहे सर्वांत पुढे!
LSG Captain Rishabh Pant : LSG IPL 2025 कॅप्टन ऋषभ पंत तथा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार बनला आहे. संघाचे मालक संजीव गोएंका यांनी त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि नवीन कर्णधाराची घोषणा केली. कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंतची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे.
ऋषभ पंत म्हणाला, मी माझ्या सर्व कर्णधारांकडून खूप काही शिकलो आहे. रोहित शर्माकडून तुम्ही खेळाडूची काळजी कशी घ्यायची हे शिकता. त्याच्या नेतृत्वातून मी हे शिकलो आणि कर्णधार म्हणून मी ते पुन्हा करू इच्छितो. तर ‘माही भाईंचे शब्द खूप प्रसिद्ध आहेत. एमएस धोनीने सांगितले होते की, क्रिकेटमध्ये तुम्ही प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा आणि निकाल आपोआप येतील. मी हे मी कायम लक्षात ठेवेन.
ऋषभ पंत IPL चा सर्वात महान कर्णधार
– एलएसजी मालक
LSG चे मालक संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की ऋषभ पंतवर लखनौ सुपर जायंट्सची जबाबदारी असणार आहे. यासोबतच, संजीव गोयंका यांनी दावा केला की, ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महान कर्णधार बनेल. ऋषभ पंत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता.
IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार
LSG चे मालक संजीव गोएंका म्हणाले, ‘सध्या लोक आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत ‘माही (MS Dhoni) आणि रोहित’ यांची नावे घेतात. माझे शब्द लक्षात ठेवा, १०-१२ वर्षांनी, ते ‘माही, रोहित आणि ऋषभ पंत’ असे म्हटले जाईल.’
या सात संघांच्या कर्णधारांची निवड
IPL 2025 मध्ये आतापर्यंत सात संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स हे आहेत. आता आरसीबी, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारांची घोषणा अजून बाकी आहे.