भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) याचिका दाखल केली आहे. धोनीनं आपल्या याचिकेत संपत कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाईची मागणी केली असून यायाचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Former Indian skipper MS Dhoni files contempt of court plea against IPS officer in Madras HC
Read @ANI Story | https://t.co/oYr26bLRQ9#MSDhoni #ContemptofCourt #IPLBetting pic.twitter.com/zheQIACAo6
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2022
धोनीचे हे प्रकरण आयपीएलवरील सट्ट्याच्या संदर्भातील आहे. धोनीने २०१४ मध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी धोनीशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दिवाणी खटला दाखल केला होता. तसेच त्यानं १०० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्याचीही विनंती न्यायालयाला केली होती. दरम्यान, न्यायालयानं १८ मार्च २०१४ रोजी संपत कुमारला धोनीविरोधात कोणतंही वक्तव्य करण्यापासून रोखत अंतरिम आदेश दिला. मात्र, त्यानंतरही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायपालिका आणि त्यांच्याविरोधात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली.