फोटो सौजन्य - IndianPremierLeague
MI vs GT पहिल्या डावाचा अहवाल : वानखेडेवर आज मुंबई इंडीयन्स विरूध्द गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामन्याचा पहिला डाव पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने दमदार सुरुवात केली आणि संघासाठी पॅावर प्लेमध्ये 2 विकेट्स घेतले त्याचा फायदा गुजरात टायटन्सच्या संघाला झाला. पहिले फलंदाजी करत मुंबई इंडीयन्सच्या संघाने गुजरात टायटन्सविरूध्द 155 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली आहे यावर एकदा नजर टाका.
आजच्या सामन्यामधील मुंबई इंडीयन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर आज मुंबईचे फलंदाज फेल ठरले. रायन रिकल्टन याने ऐज 2 चेंडूमध्ये 2 धावा केल्या. रोहित शर्मा आजच्या सामन्यात फेल ठरला त्याने 8 चेंडू खेळले आणि 7 धावा करून विकेट गमावली. विल जॅक्सने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने आजच्या सामन्यात 35 चेंडू खेळले यामध्ये त्याने 53 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार आणि 5 चौकार मारले होते. सुर्यकुमार यादव याने आज 35 धावांची खेळी खेळली.
हार्दिक पांड्या स्वतात बाद झाला, तिलक वर्मादेखील आजच्या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. नमन धीर देखील आजच्या सामन्यात 10 चेंडू खेळला आणि बाद झाला. कॅार्बिन बॅाश याने आज शेवटचे काही चेंडु शिल्लक असताना फलंदाजीला आला आणि त्याने महत्वाच्या 27 धावा केल्या. दिपक चाहर याने 8 चेंडुमध्ये 8 धावा केल्या.