UP वॉरियर्सने TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
MIW vs UPW WPL 2026 Live Score : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या नाणेफेकीत यूपी वॉरीयर्स संघाने बाजी मारली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.तर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा : IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यापैकी २ सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर स्वतः उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तिने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. , मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील UP वॉरियर्सने देखील ३ सामने खेळले आहेत. मात्र, त्यांना या स्पर्धेत अद्याप एक देखील विजय मिळवता आलेला नाही. मेग लॅनिंग आणि फोबी लिचफिल्डने UP साठी काही चांगल्या खेळी केल्या आहेत, परंतु मधल्या फळीची अपयश चिंतेची बाब आहे. UP वॉरियर्स आज त्यांचे नशीब बदलू शकतील का, की मुंबईची विजयी मालिका सुरू राहील? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर होणार हा सामना चांगलाच रोमांचक होणार अशी अपेक्षा आहे.
🚨 Toss Update 🚨@UPWarriorz elect to field against @mipaltan Updates ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/c7qdGk28Md — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026
हेही वाचा : अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर
Presenting the Playing XIs of @mipaltan and @UPWarriorz 🙌 Updates ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/mpyImx9IQY — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन: गुणालन कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, त्रिवेणी वशिष्ठ
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड






