Tata IPL GT Vs MI Live Streaming (फोटो- ट्विटर)
शुभमन गिलचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
सलामीला खेळायला आला दानिश मालेवर
मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल
Tata IPL 2026 GT Vs MI Live Updates: आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून आज डेब्यू केलेला दानीश मालेवर आज आपला पहिलाच सामना खेळत होता. दरम्यान मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 199 रन्स करून गुजरातला 200 रन्सचे टार्गेट दिले आहे. तिलक वर्माने शानदार शतक लगावले. तिलकने 45 चेंडूत 101 रन्सची वादळी खेळी केली.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने आज आपल्या संघाने अनेक बदल केल्याचे पाहायला मिळाले. दानिश मालेवर या 22 वर्षीय खेळाडूने आज मुंबईकडून डेब्यू केले. मात्र पहिल्या सामन्यात दानीश चांगली खेळी करू शकला नाही. 2 रन्स करून आउट झाला. त्या पाठोपाठ क्विंटन डी कॉक केवळ 13 रन्स करून आउट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीर खेळण्यासाठी आले.
सूर्यकुमार यादव 15 रन्स करून बाद झाला. त्यामुळे मुंबईचा संघ काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र तिलक वर्मा आणि नमन धीरने मुंबईचा डाव सावरला. नमन धीरने 45 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. हार्दिक पंड्या येताच तिलक वर्माने प्रसिद्ध कृष्णाच्या एका ओव्हरमध्ये 17 रन्स केल्या. तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. हार्दिक पंड्या 15 रन्स करून आउट झाला.
MI Vs GT Live: टॉस होताच शुभमन गिलने…; मुंबई इंडियन्स कसा सामना करणार?
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने जबरदस्त गोलंदाजी केली. रबाडाने मालेवर आणि डी कॉक या सलामीच्या जोडीला नेस्तनाबूत केले. रबाडाने सलग तीन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने सेट झालेल्या नमन धीरला आउट केले. मोहम्मद सिराजने हार्दिक पंड्याची विकेट घेतली. ग्लेन फिलिप्सने पंड्याचा अप्रतिम असा झेल पकडला.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स्, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
मैदानावर हे काय घडले? प्रिती झिंटा आणि अर्शदीप सिंगच्या ‘त्या’ मिठीची जोरदार चर्चा, Video Viral
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर / ए. एम. गझनफर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, दानिश मालेवर.






