फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
Mumbai Indians win WPL 2025 title for the second time : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सिझन संपला आहे. काल या सीझनचा शेवटचा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये भिडत पाहायला मिळाली. महिला प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम सामना शनिवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियाने ८ धावांनी पराभव करून जेतेपद नावावर केले आहे. यासह मुंबई इंडियन्सच्या संघाने महिला प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद जिंकून दुसऱ्यांदा टायटल नावावर केले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ७ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४१ धावा करू शकला. दिल्लीने सलग तिसऱ्यांदा WPL फायनल गमावली आहे.
१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मेग लॅनिंग फक्त १३ धावा करून बाद झाली. त्याच्या बाद झाल्यानंतर, शेफाली देखील ४ धावा करून बाद झाली. यानंतर, जेस जोनासेन काही खास करू शकली नाही आणि फक्त १३ धावा करून बाद झाली. तिच्या बाद झाल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जने डावाची जबाबदारी घेतली, पण ती देखील ३० धावांवर बाद झाली. एकेकाळी दिल्ली संघाने फक्त ६६ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. तिच्या बाद झाल्यानंतर, मॅरिझॅन कॅपने २५ चेंडूत ४० धावा केल्या. पण त्याच्या बाद झाल्यानंतर दिल्लीच्या आशा धुळीस मिळाल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला.
#TATAWPL 2025, you have been incredible 🙌
📸📸 We leave you with the 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 of this edition- 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐬 🏆#DCvMI | #Final | @mipaltan pic.twitter.com/yyyfVVAog3
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
कर्णधार हरमनप्रीत कौर (६६ धावा) हिच्या अर्धशतकानंतरही, महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केवळ १४९ धावाच करू शकले. मुंबई इंडियन्सकडून हरमनप्रीतने ४४ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६६ धावा केल्या, तर नॅट सायव्हर ब्रंटने ३० धावांचे योगदान दिले.
Hurricane Harman steps up on the big stage 🔥
For her swashbuckling knock of 66(44) under pressure, #MI captain Harmanpreet Kaur is named the Player of the Match👏
Scorecard ▶ https://t.co/2dFmlnw05L #TATAWPL | #DCvMI | #Final | @ImHarmanpreet pic.twitter.com/0R5zOhGSCg
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाज मॅरिझाने कॅपने मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांच्याशिवाय जेस जोनासेन आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अॅनाबेल सदरलँडला एक यश मिळाले.