बुलावायो – भारतीयांसाठी क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून, तो जिव्हाळाचा व भावनिक विषय आहे. देशात क्रिकेटला धर्म समजला जातो. आगामी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळं आत्तापासून यावर चर्चा होत आहेत. दरम्यान, किती संघ असतील, कुठल्या संघाने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं. यावर क्रिकेटप्रेमी मोठ्या आवडीने बोलताहते. दरम्यान, या विश्वचषकासाठी एक महत्त्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. नेदरलँड (Netherlands beat Scotland) क्रिकेट टीमने 12 वर्षांनंतर पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं आहे. स्कॉटलँडला हरवत नेदरलँडची वर्ल्ड कपमध्ये धडक मारली आहे. (netherlands beat scotland to enter the world cup match with India on this day which other team qualifies)
स्कॉटलँडला हरवत नेदरलँडला वर्ल्डकपचे तिकिट
दरम्यान, नेदरलँडची वर्ल्ड कप स्पर्धेत पोहचण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. नेदरलँड याआधी 1996, 2003, 2007 आणि 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. नेदरलँड भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत पोहचणारी दहावी आणि शेवटची टीम ठरली आहे. आयसीसी वर्ल्डकप क्वालिफायर्स सुपर 6 स्पर्धेतील 8 वा सामना हा नेदरलँड विरुद्ध स्कॉटलँड (Scotland)यांच्यात पार पडला. हा सामना जिंकणारी टीम वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) क्वालिफाय करणार होती. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. मात्र नेदरलँड स्कॉटलँडवर 4 विकेट्सने विजय मिळवत 2011 नंतर वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.
विश्वचषकातील भारताचे सामने
टीम इंडिया कोणत्या 7 संघांविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे. तर 11 नोव्हेंबर रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड आमनेसामने असतील. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीमधील शेवटचा सामना असणार आहे.