फोटो सौजन्य - सोशल मिडिया
२०२६ च्या टी२० विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवले जााणार आहेत. 2024 मध्ये भारताच्या संघाने टी20 विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केली होती. त्यामुळे भारताचा संघ त्यांचे टायटल डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. सुर्यकुमार यादव भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. भारती आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी नेदरलँड्सने संघाची घोषणा केली आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या मेगा स्पर्धेसाठी नेदरलँड्सने अनुभवी संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनेक परिचित चेहरे आहेत. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स, रोलोफ व्हॅन डेर मेरवे, बास डेलडे, मायकेल लेविट आणि जॅक लिऑन-कॅचेट यांना संघात स्थान देण्यात आले आहे. बांगलादेश दौऱ्याला अनुपस्थित असूनही, व्हॅन डेर मेरवे, डेलडे, लुईस आणि कॅचेट परतले आहेत. त्या दौऱ्यावरच नेदरलँड्स २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले.
अनुभवी अष्टपैलू खेळाडू कॉलिन अॅकरमन देखील संघात परतला आहे, त्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये शेवटचा टी२० सामना खेळला होता. टिम व्हॅन डेर गुगटेन देखील दीर्घकाळानंतर पुनरागमन केले आहे. जून २०२४ मध्ये झालेल्या गेल्या टी२० विश्वचषकात नेदरलँड्सकडून शेवटचा खेळलेला लोगान व्हॅन बीक देखील परतणार आहे. यावरून असे दिसून येते की या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे, तर तरुण खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात आले आहे. नेदरलँड्सचा श्रीलंकेतील पहिला सामना पाकिस्तानशी होईल. संघाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळला जाणार आहे.
🚨 Finally. Yes. It’s here. Right on time. Our Men’s @T20World squad is locked in opening vs @TheRealPCB on 7 Feb, then taking on @usacricket , @CricketNamibia1 and the reigning champions India on one of the biggest stages in world cricket pic.twitter.com/A9zw3pkOWs — Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) January 12, 2026
बांगलादेश मालिकेत खेळलेले तेजा निदामानुरू, टिम प्रिंगल आणि विक्रमजीत सिंग यावेळी खेळू शकणार नाहीत, त्यांच्यासोबत सेड्रिक डी लँगे, सिकंदर झुल्फिकार, सेबॅस्टियन ब्राट, डॅनियल डोरम, शारिझ अहमद आणि रायन क्लेन यांचा समावेश आहे. नेदरलँड्सचा संघ ग्रुप ए मध्ये आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. लीग टप्प्यात नेदरलँड्सचा सामना पाकिस्तान, नामिबिया, अमेरिका आणि गतविजेत्या टीम इंडियाशी होईल. नेदरलँड्सच्या पुरुष संघाचा हा सातवा टी-२० विश्वचषक आहे. २००९ पासून हा संघ टी-२० विश्वचषकात खेळत आहे.
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, नोआ क्रुस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, मायकेल लेविट, जॅक लिऑन-कॅशेट, मॅक्स ओ’डॉड, लोगन व्हॅन बीक, टिम वॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मेरवे, साउकेर, जॅक मेरवे, जॅक.






