फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी अनेक खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू चॅम्पियन ट्रॉफीमधून दुखापतीमुळे बाहेर झाल्याचे वृत्त समोर आले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली देखील जखमी आहेत त्यामुळे सध्या ते सुरु असलेल्या इंग्लडविरुद्ध मालिकेमधून बाहेर आहेत. आता न्यूझीलंडच्या संघाला चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी अडचणी वाढल्याची माहिती समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे अनेक संघांचे टेन्शन वाढले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघातील अनेक स्टार खेळाडू दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, न्यूझीलंड संघालाही मोठा धक्का बसताना दिसत आहे. संघातील स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे, त्यामुळे या खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे कठीण मानले जात आहे.
दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या ILT20 लीगमध्ये अनेक देशांचे मोठे खेळाडू खेळत आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचे नावही समाविष्ट आहे. लॉकी डेझर्ट वायपर्स संघाकडून खेळत होता. यादरम्यान, दुबई कॅपिटल्ससोबत खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात तो हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त होताना दिसला. ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनला स्कॅन करावे लागले. या स्पर्धेत लॉकी फर्ग्युसन डेझर्ट वायपर्स संघाचे नेतृत्वही करत होता.
Lockie Ferguson is under an injury cloud, ahead of the tri-series in Pakistan and the Champions Trophy, after hurting his hamstring while playing in the UAE’s ILT20
Full story: https://t.co/Reb7VV9VY3 pic.twitter.com/W8nVCBylgu
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 7, 2025
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी पाकिस्तानमधील तिरंगी मालिकेपूर्वी सांगितले की, “लॉकीचे युएईमध्ये स्कॅनिंग झाले. आमच्याकडे फोटो आहेत आणि ते किती गंभीर आहे हे पाहण्यासाठी रेडिओलॉजिस्टच्या अहवालाची वाट पाहत आहोत. “असे दिसते की ही हॅमस्ट्रिंगची किरकोळ दुखापत आहे, त्यामुळे आम्ही त्याबाबत सल्ला घेण्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहत आहोत आणि त्यानंतरच आम्ही ठरवू की लॉकी येथे येईल की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या जागी आम्हाला दुसऱ्या कोणाला तरी खेळवावे लागेल.”
Lockie Ferguson is under an injury cloud, ahead of the tri-series in Pakistan and the Champions Trophy, after hurting his hamstring while playing in the UAE’s ILT20. pic.twitter.com/5Xjtj6ZW4J
— Caught & Bowled (@caught1bowled) February 8, 2025
ILT20 लीगचा पहिला क्वालिफायर सामना डेझर्ट वायपर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये डेझर्ट वायपर्सना दुबई कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.