फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मिडिया
New Zealand vs West Indies 2nd Test Day 2 Report : वेलिंग्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि पदार्पण करणाऱ्या मिशेल हे यांनी शानदार अर्धशतके झळकावून त्यांच्या संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला, दुसऱ्या डावात सुरुवातीच्या दोन विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिज अजूनही ४१ धावांनी पिछाडीवर आहे. दिवसअखेर त्यांची २ बाद ३२ धावा होत्या. खरं तर, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी (NZ vs WI 2nd Test Day 2), वेस्ट इंडिजचा पहिला डाव २०५ धावांवर संपला. किवीजकडून ब्लेअर टिकनरने ३२ धावा देऊन ४ बळी घेतले, पण तो क्षेत्ररक्षण करताना पडला आणि त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले. टिकनरच्या जाण्याने किवीजना मोठा धक्का बसला. बोर्डाने दुसऱ्या कसोटीच्या उर्वरित चार दिवसांना तो मुकणार असल्याचे जाहीर केले.
टिकनरच्या अनुपस्थितीत, मायकेल रॉयने गोलंदाजीवर उत्कृष्ट कामगिरी करत वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात तीन बळी घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पदार्पण करणाऱ्या मायकेल रॉयने दुसऱ्या डावात एक बळी घेतला. जेकब डफीलाही यश मिळाले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग (१५*) आणि केव्हम हॉज (३*) नाबाद राहिले. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा कसोटी दिवस: न्यूझीलंडने पहिला डाव २७९ धावांवर घोषित केला.
Stumps after another great day of Test cricket. See you back here at 11am tomorrow morning.#NZvWIN | 📸 = @PhotosportNZ pic.twitter.com/dR4p3DeBmo — BLACKCAPS (@BLACKCAPS) December 11, 2025
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी केली. दोघांनीही प्रभावी सुरुवात केली, परंतु लॅथम ४२ चेंडू खेळल्यानंतर ११ धावांवर बाद झाला. डेव्हॉन कॉनवेने १०८ चेंडूत ८ चौकारांसह ६० धावा केल्या. विल्यमसननेही ३७ धावा केल्या, तर डॅरिल मिशेलने २५ धावा केल्या. यष्टीरक्षक मिशेल हेने ९३ चेंडूत ६१ धावा केल्या.
हे कॉनवेचे वेस्ट इंडिजविरुद्धचे पहिले आणि एकूण १३ वे अर्धशतक होते. दरम्यान, ६ व्या क्रमांकावर खेळणाऱ्या मिचेल हेने जलद धावा केल्या आणि पदार्पणातच शानदार ६१ धावा केल्या. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे न्यूझीलंडने २७८/९ धावांवर डाव घोषित केला.






