फोटो सौजन्य - JioHotstar
Mumbai Indians vs UP Warriorz : एकीकडे चॅम्पियन ट्रॉफीचा महासंग्राम सुरु आहे तर दुसरीकडे महिला प्रीमियर लीगचे सामने सुरु आहेत. महिला प्रीमियर लीग आता शेवटच्या टप्प्यात आहे. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॅरियर्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये मुंबई इंडिअन्सच्या संघाने युपीचा ६ विकेट्सने पराभव करून गुणतालिकेमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कमालीचा खेळ दाखवला आहे.
नितीश राणा आणि साची मारवाह करणार दोन जुळ्या बाळाचं स्वागत, IPL 2025 आधी दिली चाहत्यांना खुशखबर
कालच्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्सेलस्टोन यांच्यामध्ये चालू सामन्यात कडाक्याचा वाद पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हरमनप्रीत कौर सोफी एक्सेलस्टोनवर ओरडताना दिसत आहे. आता तिला या केलेल्या कृत्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला तिच्या सामन्याच्या फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
Heated moment between HarmanpreetKaur and Eccelstone in WPL.pic.twitter.com/s5am45ppsc
— Don Cricket 🏏 (@doncricket_) March 7, 2025
ही घटना यूपी वॉरियर्सच्या डावाच्या १९ व्या षटकात घडली जेव्हा पंच अजितेश अर्गल यांनी हरमनप्रीत कौरला सांगितले की स्लो ओव्हर-रेटमुळे शेवटच्या षटकात फक्त तीन क्षेत्ररक्षक वर्तुळाबाहेर राहू शकतात असा नियम आहे. यामुळे हरमनप्रीत कौर नाराज झाली आणि तिने पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि अमेलिया केर देखील या वादामध्ये सामील झाली. आता शेअर केलेल्या महिला प्रीमियर लीगने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हरमनप्रीत कौरने कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा कबूल केला आहे जो सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर असहमती व्यक्त करण्याशी संबंधित आहे.
🚨 Mumbai Indians captain Harmanpreet Kaur has been reprimanded and fined 10% of her match fees for Level 1 offence of showing dissent at an umpire’s decision.#WPL2025 pic.twitter.com/7FVm1fFJW9
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 7, 2025
लेव्हल १ च्या गुन्ह्यात, सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूने जेव्हा काही समजावून सांगण्यासाठी पंचांकडे धाव घेतली तेव्हा हरमनप्रीत कौरचा यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोनशीही वाद झाला. हरमनप्रीतने त्याला या संभाषणापासून दूर राहण्याचा इशारा केला. वाद वाढत असल्याचे पाहून स्क्वेअर लेग पंच एन जनानी आणि उत्तर प्रदेशची कर्णधार दीप्ती शर्मा देखील पुढे आल्या. उत्तर प्रदेशच्या ९ बाद १५० धावांच्या प्रत्युत्तरात, मुंबईने १८.३ षटकांत लक्ष्य गाठले.