फोटो सौजन्य - Proteas Men
गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकतर्फी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी केली आणि ८ विकेट्सने सहज विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पाकिस्तानने पहिला सामना २ विकेट्सने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ९ विकेट्स गमावून २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ५९ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
पाकिस्तानकडून वसीम आणि फहीमने १-१ विकेट घेतल्या. कर्णधार शाहीन आफ्रिदीला कोणतेही यश मिळाले नाही. २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला डी कॉक आणि प्रिटोरियसने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. ४० चेंडूत ४६ धावा काढून प्रिटोरियस बाद झाला. त्याने त्याच्या डावात सात चौकार आणि एक षटकार मारला. टोनी जॉर्जी ६३ चेंडूत ७६ धावा काढून बाद झाला. त्याने या डावात ९ चौकार आणि तीन षटकार मारले.
यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ११९ चेंडूत ८ चौकार आणि सात षटकार मारून १२३ धावा केल्या. ब्रिट्झकेने २१ चेंडूत १७ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून फहीम अशरफने एक बळी घेतला आणि वसीम ज्युनियरने एक बळी घेतला. त्याआधी पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज फखर झमान खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. माजी कर्णधार बाबर आझमही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि ११ धावा काढून बाद झाला. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने ४ धावा केल्या. सॅम अयुब ६६ चेंडूत ५३ धावा काढून बाद झाला. तलत २० चेंडूत फक्त १० धावा करू शकला. सलमान आघा यांनी १०५ चेंडूत ६९ धावा केल्या.
A dominant century! 💯 What a knock from Quinton de Kock! A reminder of his trademark aggression and masterful skill. 🌟🏏 A superb innings from our experienced opener. 🇿🇦 pic.twitter.com/yU2N7QiuH7 — Proteas Men (@ProteasMenCSA) November 6, 2025
फहीम अश्रफ यांनी १८ चेंडूत २८ धावा केल्या. कर्णधार शाहीन आफ्रिदी यांना फक्त एक धाव करता आली. मोहम्मद नवाज यांनी ५९ चेंडूत ५९ धावा केल्या. आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर यांनी ४, पीटर यांनी ३ आणि बॉश यांनी २ बळी घेतले. त्याआधी, सॅम अयुब (५३), सलमान अली आगा (६९) आणि मोहम्मद नवाब (५९) यांच्या अर्धशतकांमुळे पाकिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली. बाबर (११) आणि रिझवान (४) शांत राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून नादर बर्गरने चार आणि पीटरसनने तीन बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
Ans: दुसरा सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी
Ans: डी कॉकने ठोकले शतक






