फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आज श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुपर चारचा महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे या दोन्ही संघांमध्ये जो संघ आज विजय मिळेल तो संघ फायनल च्या शर्यतीत टिकून राहील आणि जो संघ पराभूत होणार आहे तो संघ पायलच्या शर्यतीमधून बाहेर होणार आहे. आशिया कप २०२५ मधील सुपर-४ चा तिसरा सामना आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा असणार आहे, येथून आणखी एक पराभव संघाला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो. दोन्ही संघांनी सुपर-४ मध्ये १-१ सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारतीय संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता.
हवामान विभागाच्या मते, सामन्यादरम्यान अबू धाबी उष्ण आणि दमट राहील. तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही आणि आकाश निरभ्र राहील. तथापि, उष्णतेमुळे खेळाडूंना काही अडचणी येऊ शकतात.
अबू धाबीमधील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते, जिथे फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. त्यामुळे, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त फिरकी गोलंदाजांचा समावेश करू इच्छितात. आशिया कप २०२५ चे आतापर्यंत सात सामने अबू धाबीमध्ये खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने तीन जिंकले आहेत. त्यामुळे, आज नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतील.
Asia Cup 2025
Pakistan vs Sri Lanka, Super Fours, 15th Match
Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi
Sep 23, 08:00 PM (IST) IndianSportsFans
10:04 HRS #PAKvsSL #AsiaCup2025 #CricketTwitter #HarisRauf pic.twitter.com/7PA52JcrPk — Indian Sports Fans. Fan Curated & Original (@IndianSportFan) September 23, 2025
सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अद्याप विजय मिळालेला नाही. श्रीलंका साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिला, तर चरिथ असलंकाच्या संघाला पहिल्याच सुपर फोरमध्ये पराभव पत्करावा लागला. आता, दोन्ही संघ आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. पॉइंट टेबलमध्ये दोन्ही संघांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे.