टी २० विषवचषक स्पर्धा (World Cup) १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु होत आहे. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान (India Vs Paksitan) हे दोन पारंपारिक विरोधी संघ एकमेकांसमोर येणार आहेत. दोन्ही विरोधी संघातील खेळाडू एकमेकांवर प्रभावी ठरण्यासाठी सज्ज असून अशातच एका पाकिस्तानच्या गोलंदाजाने भारतीय खेळाडूंना आव्हान वजा इशारा दिला आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ (Haris Rauf) याने स्वत:ची कॉलर टाईट करत टीम इंडियाला इशारा दिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांना माझ्याविरुद्ध खेळणं सोपं असणार नाही, असं हारिस म्हणाला.
पहा काय म्हणाला हारिस रऊफ :
मी टी २० विश्वचषकामध्ये माझं सर्वोत्तम प्रदर्शन देऊ शकलो तर भारतीय फलंदाजांसाठी मला खेळवणे सोपे जाणार नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. हे माझे घरचे मैदान आहे कारण मी मेलबर्न स्टार्सकडून खेळतो. मला तिथे कसे खेळायचे हे माहित आहे, असं हारिस म्हणाला.
भारताविरुद्ध खेळण्यासाठी काही खास प्लॅन आहे का?, असा प्रश्न विचारल्यावर, भारताविरुद्ध गोलंदाजी कशी करायची याचीही मी रणनीती आखायला सुरुवात केली आहे, असंही उत्तर हारिसने (Pakistan fast bowler haris rauf) यावेळी दिलं.
दरम्यान, मागील टी २० विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्ताने भारताला हारवलं होतं. भारताविरुद्ध पाकिस्तानला फक्त एकच सामना जिंकता आला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता भारतीय संघ देखील सज्ज झाल्याचं दिसत आहे.