इंडिया आणि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Abdullah Shafiq-Rituraj Gaikwad : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या डॉन देशात बरीच कटुता निर्माण झाली आहे. ज्याचा परिणाम दोन्ही देशांच्या खेळांवर देखील दिसून आला आहे. असो, भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच होतो. पण आता यावरदेखील आता शंका निर्माण झाली आहे. या सगळ्यानंतर, आता भारत आणि पाकिस्तानचे दोन खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत.
भारताचा ऋतुराज गायकवाड आणि पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक एकाच संघाकडून खेळताणा दिसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी खेळाडू अब्दुल्ला शफीकने इंग्लिश काउंटी क्लब यॉर्कशायरसोबत करार केला असून आता तो ट्रेंट ब्रिज आणि यॉर्क येथे दोन चॅम्पियनशिप सामने खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा : निवृत्तीनंतर, या धडाकेबाज ऑस्ट्रेलियन खेळाडूने या लीगमध्ये केले पदार्पण, गोलंदाजांना जोरदार फटकारले
चॅम्पियनशिप सामन्यांव्यतिरिक्त, ते चार टी-२० सामन्यांमध्ये देखील सहभागी होणार आहेत. हे सर्व सामने व्हाइटॅलिटी टी-२० ब्लास्ट अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील टी-२० ब्लास्टमध्ये खेळणार आहे. अशा परिस्थितीत, आता भारत आणि पाकिस्तानचे हे दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळणार आहेत. ऋतुराज गायकवाडने याआधीच यॉर्कशायरशी करार केला आहे.
यॉर्कशायरशी करार केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू अब्दुल्ला शफीक यान आनंद व्यक्त केला आहे. तो येथे खेळण्यास खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. अब्दुल्ला शफीक याबाबत बोलला की, “यॉर्कशायरशी खेळण्याची संधी मिळाल्याने खूप आनंदी आहे.” त्याच वेळी, तो नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी यॉर्कशायरमध्ये सामील होण्यास देखील उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : गिलपासून जडेजापर्यंत… हे भारतीय खेळाडू लीड्समध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज
पाकिस्तानसाठी, तरुण खेळाडू अब्दुल्ला शफीकने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात शानदार केली. त्याने शेजारील देश बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये ५२ आणि ७३ धावांची खेळी केली होती. यानंतर, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याची बॅट खूप काही करू शकली नाही. त्यानंतर लवकरच त्याचे नाव पाकिस्तान संघातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये येऊ लागले. पाकिस्तानसाठी, शफीकने एकूण २२ कसोटी सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने १५०४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे ५ शतकांचा देखील समावेश आहे.