फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : बऱ्याच दिवसांपासून २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर असे म्हंटले जात होते की, पाकिस्तानमध्ये होणार २०२५ चा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे सामने. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याचबरोबर अनेक पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर दुजोरा दिला होता असे बऱ्याच सोशल मीडिया अकाऊंवर आले होते. आता यावर नवा प्लॅन आयसीसीचा सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या तीन पर्यायांवर विचार करत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे अधिकार पाकिस्तानकडे असतानाही आयसीसी इतर पर्याय शोधत आहे.
वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हंटले जात आहे की, आयसीसीची एका हायब्रीड मॉडेलवरही चर्चा सुरु आहे. यामध्ये असा एक आयसीसीचा प्लॅन आहे की, ज्यामध्ये पाकिस्तान आणि यूएईमध्ये सामने संयुक्तपणे खेळवले जाऊ शकतात. यामध्ये भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमध्ये खेळवले जाऊ शकतात. तर असेही म्हंटले जात आहे की, याशिवाय आणखी एका पर्यायाची चर्चा आहे, ज्यामध्ये संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याची चर्चा आहे. यावर अजुनपर्यत यावर बीसीसीआयने किंवा आयसीसीने कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर सध्या UAE, श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिका हे संभाव्य ठिकाण मानले जात आहेत. १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-यजमान असलेल्या पाकिस्तानने तेव्हापासून कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते, परंतु २००८ मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ही संधी वाया गेली. २००८ पासून भारताने कधीही आपला संघ पाकिस्तान दौऱ्यावर पाठवला नाही.