फोटो सौजन्य : IndianPremierLeague
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या डावाचा अहवाल : लखनऊच्या होम ग्राउंडवर आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये या सिझनचा शेवटचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात जितेश शर्माने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊ सुपर जायंट्स संघाने पहिले फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर 228 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यामध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला टाॅप 2 मध्ये स्थान मिळवण्याची आज संधी आहे. आजच्या सामन्यात बंगळुरुच्या संघाने जर विजय मिळवला तर संघ पंजाब किंग्स विरुद्ध लढेल आणि जर पराभव झाला तर संघ मुंबईशी एलिमिनेटर सामना खेळेल.
आजच्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. लखनऊ सुपर जायंट्स फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर मॅथ्यू ब्रीट्झके याला आज आयपीएल 2025 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली पण तो संघासाठी मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला त्याने 12 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या यामध्ये त्यांनी एक षटकार आणि एक चौकार मारला. त्यानंतर मिचेल मार्श याने आज आज आणखी एकदा धुवाधार खेळी खेळली त्याने आजच्या सामन्यात 37 चेंडूंमध्ये 67 धावा केला यामध्ये त्यांनी पाच षटकार आणि चार चौकार मारले.
IPL 2025 Closing Ceremony ला ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआय करणार खास कार्यक्रमाचे आयोजन
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतसाठी फार काही कामगिरी करु शकला नाही. पण आजच्या सामन्यामध्ये त्याने संघासाठी विशेष कामगिरी केली आहे. त्याने आजच्या सामन्यात शतक ठोकले आणि नाबाद खेळी खेळली. या सामन्यात रिषभ पंतने बंगरू विरुद्ध ६१ चेंडूंमध्ये 118 नाबाद धावा केल्या यामध्ये त्याने 8 षटकार आणि 11 चौकार मारले. त्याचा आयपीएल 2025 मधील हे पहिले शतक आहे याआधी त्यांनी एक अर्धशतक मारले होते. निकलस पुरण हा मिचेल मार्श याचा विकेट गेल्यानंतर फलंदाजीला आला होता पण तो या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने 10 चेंडू खेळले आणि या मग त्याने 13 धावा केल्या.
Innings break!
Rishabh Pant leads from the front with a ritzy 💯 to take #LSG to 227/3 🔥
Will #RCB pull off this hilly task? 🤔
Scorecard ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/k50cNKn9DB
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
रॉयल चॅलेंजेस बंगळुरुच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर आज पुन्हा संघामध्ये फिल्ल साॅल्ट सामील झाला आहे. त्यामुळे आजच्या या दोघांचा कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे कारण की मोठी धावसंख्या पाठलाग करत असल्यामुळे या दोघांकडून चांगला खेळीची अपेक्षा असेल.