फोटो सौजन्य : Delhi Capitals/Punjab Kings
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स खेळपट्टीचा अहवाल : आज आयपीएल 2025 चा 66 वा सामना रंगणार आहे, हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आयपीएलचा अठरावा सीजन सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. प्ले ऑफमध्ये जाणारे चार संघ हे ठरले आहेत यामध्ये पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ प्लेऑफचे सामने खेळणार आहेत. आजचा सामना हा सवाई मानसिंग स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे या मैदानावर खेळभट्टीचा फायदा कोणाला होणार यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
पंजाब विरुद्ध दिल्ली सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, दोन्ही कर्णधार – श्रेयस अय्यर आणि फाफ डू प्लेसिस – अर्धा तास आधी टॉस होईल. या सामन्यासाठी अक्षर पटेल तंदुरुस्त होण्याची आशा फारच कमी आहे, अशा परिस्थितीत फक्त डू प्लेसिसच संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. पंजाब किंग्जसाठी टॉप-२ मध्ये राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जर पीबीकेएसने आज डीसीला हरवले तर श्रेयस अय्यरचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-१ बनू शकतो. चला पीबीकेएस विरुद्ध डीसी खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
आजकाल भारतातील बहुतेक मैदानांप्रमाणे, सवाई मानसिंग स्टेडियम देखील फलंदाजांसाठी अनुकूल आहे. पंजाब विरुद्ध दिल्ली सामना हा हाय स्कोअरिंग सामना असण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची भूमिका असू शकते म्हणून प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल. १९० धावांपेक्षा जास्त धावसंख्या चांगली मानली जाऊ शकते. नवीन चेंडूचा वापर केल्यास वेगवान गोलंदाजांना काही फायदा होऊ शकतो.
सवाई मानसिंग स्टेडियम वर आत्तापर्यंत 62 सामना खेळवण्यात आले आहेत. यामध्ये पहिले फलंदाजी करणारा संघाने आतापर्यंत 23 धावणे जिंकले आहेत तर या मैदानावर लक्षाचा पाठला करणाऱ्या संघाने 39 सामने जिंकले आहेत. या मैदानावर जो संघ पहिले नाणेफेक जिंकतो त्या संघाने 34 सामने जिंकले आहेत तर नाणेफेक गमावणाऱ्या संघाने 28 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च धावसंख्या या मैदानावर 219 आहे तर सर्वात कमी धावसंख्या ही 59 इतकी आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आत्तापर्यंत 34 सामने खेळवण्यात आले आहेत यामध्ये 17 सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने विजय मिळवला आहेत तर 16 सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवण्यात यश मिळवले आहे.