फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Punjab Kings vs Rajasthan Royals match report : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये नुकताच सामना पार पडला. या सामन्यांमध्ये त्याचबरोबर निहाल वडेराने संघासाठी दमदार फलंदाजी केली. त्याचबरोबर राजस्थान रॉयलसाठी त्यांचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने संघासाठी धुव्वादार फलंदाजी करताना दिसला. या सामन्यात पंजाब किंग्सला आयपीएल २०२५ च्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर त्यांना ५० धावांनी पराभूत केले आहे. पंजाब किंग्सचा हा तिसरा सामना होता, पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता पण त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभवाचा २० धावांनी सामना करावा लागला.
पंजाब टीमचे पहिले चार फलंदाज स्वस्तात बाद झाले. मागील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणारा प्रभासिमरन सिंग या सामन्यात मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध १६ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या आणि कुमार कार्तिकेयाने त्याला बाहेर रस्ता दाखवला. दमदार फॉर्ममध्ये असलेला पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मागील दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले होते पण या सामन्यात त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी २१ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. सुयश शेंडगेची बॅट शांतच राहिली.
Match 18. Rajasthan Royals Won by 50 Run(s) https://t.co/kjdEJydDWe #PBKSvRR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन या दोघांनी दमदार सुरुवात करून दिली. यशस्वी जयस्वालने संघासाठी ४५ धावांमध्ये ६७ धावा केल्या यामध्ये त्याने पाच षटकार आणि तीन चौकार ठोकले तर संजू सॅमसन यांनी २६ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना, रियान परागनेही शानदार फलंदाजी केली आणि २५ चेंडूत ४३ धावा केल्या. १७२ च्या स्ट्राईक रेटने खेळताना रायनने ३ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार मारले. शेवटच्या षटकांमध्ये ध्रुव जुरेलने ५ चेंडूत १३ धावा फटकावल्या, ज्यामुळे राजस्थानने २० षटकांत ४ गडी गमावून २०५ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. जोफ्रा आर्चरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्यला दिवसाच्या वेळेत स्टार दाखवले. आर्चरचा चेंडू आगीच्या गोळ्यासारखा प्रियांशकडे आला आणि तो जमिनीवर कोसळला. या षटकात आर्चरने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. यावेळी इंग्लिश गोलंदाजाने श्रेयस अय्यरला आपला बळी बनवले. अय्यरने आर्चरच्या चेंडूवर जागा निर्माण करून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण वेगामुळे तो पूर्णपणे पराभूत झाला आणि चेंडू त्याच्या स्टंपवर आदळला. अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.