arshdeep singh viral video (फोटो- ट्विटर)
अर्शदीप सिंहचा व्हिडिओ व्हायरल
प्रीती झिंटा आहे पंजाब किंग्जची मालक
पंजाब किंग्जचा लखनौवर एकतर्फी विजय
Tata IPL PBKS Vs LSG: टाटा आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. काल चंदीगड येथील क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौच्या संघावर एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. पंजाब किंग्ज आणि संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. याचदरम्यान प्रीती झिंटा आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्जची सह मालकीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा अनेकदा सोशल मिडियावर व्हायरल होत असते. कालचा सामना पंजाब किंग्जने जिंकल्यावर प्रीती झिंटाचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि प्रीती झिंटाचा आहे.
काल चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सामना खेळवला गेला. यामध्ये पंजाबने एकतर्फी सामना जिंकला. त्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांची भेट घेत असताना प्रीती झिंटा ग्राउंडवर आली आणि सर्व खेळाडुंचे अभिनंदन करू लागली. याच दरम्यान प्रीती झिंटाने अर्शदीप सिंहला मिठी मारल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Arshdeep 🤣 Seems like his dream came true yesterday 😂pic.twitter.com/HS1OFQGi9w — Out Of Context Cricket (@GemsOfCricket) April 20, 2026
त्यानंतर अर्शदीप सिंहने मोठा जल्लोष केला असल्याचे दिसून येत आहे. अर्शदीप सिंहचा आनंद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जवळच उभा असणारा मोहम्मद शामी देखील हे पाहून हसू लागला. तर प्रीती झिंटा देखील हसताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Punjab ठरले अखेर ‘King’
आयपीएल २०२६ मध्ये, फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्सचा सामना रविवारी लखनौ सुपर जायंट्सशी झाला. हा सामना पंजाबमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. पंजाब मुळातच ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात, पंजाबने ७ गडी गमावून २५४ धावा केल्या.
PKBS vs LSG Result: लखनऊची तुफान सुरूवात, पण Punjab ठरले अखेर ‘King’; लढा पडला कमी
या धावांचा पाठलाग करताना लखनौच्या संघाने खूपच चांगली सुरूवात केली. LSG च्या पहिल्या जोडीने चांगली भागीदारी करत हा विजय मिळविण्याचा प्रयत्न केला. लखनौ सुपर जायंट्स संघात नवीन सलामीची जोडी एडन मार्करामच्या जागी आयुष बडोनी आला आणि मिचेल मार्शसह त्याने चांगली भागीदारी केली. मात्र बडोनी 21 बॉलमध्ये 35 धावा काढून बाद झाल






