पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये प्रवेश (फोटो- ians)
जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत महिला एकेरी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आगामी काळात लवकरच एशियन्स गेम्स स्पर्धा होणार आहे. त्यामुळे परतलेला पीव्ही सिंधूचा फॉर्म भारतासाठी दिलसडायक समजला जात आहे. 17 जुलै रोजी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा विजय झाला आहे.
क्वार्टर फायनलमध्ये जपानची माजी खेळाडू नोजोमी ओकुहरा हिच्याशी होणार होता. मात्र ओकुहराने तिला झालेल्या दुखापतीमुळे क्वार्टर फायनलच्या आधीच माघार घेतली. त्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये एकही शॉट न खेळता पीव्ही सिंधूने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. 18 जुळू रोजी पीव्ही सिंधू आपला सेमीफायनलकहा सामना खेळणार आहे.
PV Sindhu ची विजयी गर्जना! Japan Open 2026 मध्ये केली धमाकेदार सुरूवात; अवघ्या ३५ मिनिटांत…
पीव्ही सिंधुला सेमीफायनलमध्ये चीनच्या चेन यूफेईचे आव्हान असणार आहे. यूएफईने क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा पराभव केला होता. यूएफई ही टोकियो ऑलिंपिकची सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीत ती चौथ्या स्थानावर आहे. पीव्ही सिंधु आणि यूफेईमध्ये शेवटचा सामना 2019 मध्ये झाला आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 14 सामने झाले असून यूफेईने 8-6 अशी आघाडी प्राप्त केल्याचे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत फायनलमध्ये जाण्यासाठी पीव्ही सिंधूवर यूफेईचे मोठे आव्हान असणार आहे.
यंदाच्या वर्षात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु आपली तिसरी सेमीफायनल खेळणार आहे. याआधी तिने मलेशिया ओपेन आणि ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्य प्रवेश केला आहे. या स्पर्धेत तिने चीनच्या हान यूएचा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.
इस्रायल-इराण युद्धाच्या काळात PV Sindhu आली अडचणीत, बास्केटबॉल संघाबद्दलही एक मोठी अपडेट
Japan Open 2026 मध्ये केली धमाकेदार सुरूवात
पीव्ही सिंधु आणि मिश्र दुहेरीतील ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो जोडीने जपान ओपन 2026 मध्ये विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दुखापतीमुळे पहिल्याच फेरीमधून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीत जागतिक पीव्ही सिंधु 10 व्या स्थानावर आहे. पीव्ही सिंधुने जपान ओपन 2026 स्पर्धेत मलेशियाच्या ‘वोंग लिंग चिंग’ हिचा 35 व्या मिनिटाला दारुण पराभव केला. पीव्ही सिंधुने 21-14, 21-11 असा पराभव केला आहे. या संपूर्ण सामन्यात पीव्ही सिंधुने आपले वर्चस्व कायम राखले होते.






