जपान ओपन 2026 (फोटो- ians)
पीव्ही सिंधु आणि मिश्र दुहेरीतील ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो जोडीने जपान ओपन 2026 मध्ये विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दुखापतीमुळे पहिल्याच फेरीमधून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीत जागतिक पीव्ही सिंधु 10 व्या स्थानावर आहे. पीव्ही सिंधुने जपान ओपन 2026 स्पर्धेत मलेशियाच्या ‘वोंग लिंग चिंग’ हिचा 35 व्या मिनिटाला दारुण पराभव केला. पीव्ही सिंधुने 21-14, 21-11 असा पराभव केला आहे. या संपूर्ण सामन्यात पीव्ही सिंधुने आपले वर्चस्व कायम राखले होते.
इस्रायल-इराण युद्धाच्या काळात PV Sindhu आली अडचणीत, बास्केटबॉल संघाबद्दलही एक मोठी अपडेट
जपान ओपन 2026 स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले आहे. दुखापतीमुळे त्यांना या स्पर्धेबाहेर जावे लागले. पहिला गेम या जोडीने गमावला. मात्र त्यानंतर सात्विकच्या खांद्याची जुनी दुखापत त्रास देऊ लागली. त्यामुळे या जोडीने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर पीव्ही सिंधुने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
जपान ओपन स्पर्धेत भारताला आनंदाची आणि थोडीशी निराश करणरी बातमी समोर आली आहे. एक जोडी जिंकली आहे तर दुसरी जोडी स्पर्धेतून बाहेर गेली आहे. सात्विकला झालेल्या दुखापतीमुळे त्याची जोडी बाहेर पडली आहे. याचा फटका कदाचित पुढील आठवड्यात होणाऱ्या चायना ओपन 2026 स्पर्धेत बसू शकतो. त्याची दुखापत ठीक न झाल्यास त्याचे खेळणे कठीण होऊ शकते. सात्विक आणि चिराग यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
1982 मध्ये सुरू झालेल्या या जपान ओपन स्पर्धेत भारताला एकही विजेतेपद मिळाले नाही. त्यामुळे या ट्रॉफीवर नाव कोरण्याचे स्वप्न भारताचे अपुरे राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या २०२६ च्या आवृत्तीत हा इतिहास बदलण्याचा आणि भारताचे पहिले जपान ओपन जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे.






