Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ आणि केरळ असणार आमने-सामने, कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहता येणार Live सामने, जाणून घ्या सविस्तर
Ranji Trophy 2025 Final Match : यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये दोन्ही नवखे संघ आमने-सामने असणार आहेत. अनेक दिग्गज संघ या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. गुजरातला अगदी नाट्यमयरित्या केरळने मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २०२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये, मुंबईचा विदर्भाकडून पराभव झाला आणि गुजरातचा केरळकडून उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर असणार आहेत. हा सामना कधी खेळला जाईल, किती वाजता सुरू होईल आणि कोणत्या चॅनेलवर प्रसारित होईल यासंबंधी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
केरळची अंतिम फेरीत धडक
A special moment for Kerala 👌
They have qualified for the final for the first time in the #RanjiTrophy 👏
It's Vidarbha vs Kerala in the final showdown 🔥
Scorecard ▶️ https://t.co/kisimA9o9w#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #GUJvKER | #SF1 pic.twitter.com/VCasFTzbB7
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 21, 2025
विदर्भ आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल २०२५ सामना बुधवार (२६ फेब्रुवारी) ते रविवार (२ मार्च) दरम्यान नागपूरमधील जामता येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) स्टेडियमवर खेळला जाईल. सामना सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. तर बंद होण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजता निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हाला हा सामना लाईव्ह पाहून आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला स्पोर्ट्स १८ चॅनलवर जावे लागेल. तथापि, ते OTT द्वारे पाहण्यासाठी, तुम्हाला Jio Hotstar अॅपवर जावे लागेल.
रणजी करंडक स्पर्धेसाठी विदर्भ संघ : अक्षय वाडकर (कर्णधार/यष्टीरक्षक), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, शुभम कापसे, नचिकेत भुते, सिद्धेश वाथ (यष्टीरक्षक), यश ठाकूर, दानिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे.
रणजी करंडक स्पर्धेसाठी केरळ संघ : सचिन बेबी (कर्णधार), रोहन एस. कुन्नुमल, बाबा अपराजित, विष्णू विनोद, मोहम्मद अझरुद्दीन, अक्षय चंद्रन, शॉन रॉजर, जलज सक्सेना, सलमान निजार, आदित्य सरवटे, बासिल थंपी, एम.डी. निधीश, एन.पी. बेसिल, एन.एम. शराफुद्दीन आणि ई.एम. श्रीहरी