फोटो सौजन्य - JioHotstar
Virat Kohli Ravindra Jadeja Funny Video : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल सामना पार पडला. या सामन्यांमध्ये १७ वर्षानंतर चेन्नईच्या संघाला दुसऱ्यांदा बंगळुरूने त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ५० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. कालच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने त्याचबरोबर बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदाराने कमालीची फलंदाजी दाखवली. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज फेल ठरले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे दोघे एकमेकांची चेष्टा करताना दिसत आहेत.
शेवटच्या काही षटकांमध्ये रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला होता पण सांगायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्सने हा सामना गमावला होता, कारण की जवळजवळ ८० ते ९० धावा विजयासाठी हव्या होत्या पण शेवटच्या पाच शतकांमध्ये ते होणे अशक्य होते. त्यामुळे अशावेळी रवींद्र जडेजा फलंदाजी करत असताना विराट कोहली नाचत त्याच्या समोर येतो आणि त्याला नाचून दाखवत असतो. यावेळी त्यांची चेष्टा मस्करी होते आणि त्या दोघेही हसू लागतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
“Pyaar se chidaaya jaa raha hai” 😁🙌🏻
Our Comm box discusses how @imVkohli took a cheeky dig at @imjadeja while #RCB was dominating #CSK at their home! ❤💛#IPLonJioStar 👉 #GTvMI | SAT, 29th MAR, 6.30 PM | LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar | #IPL2025… pic.twitter.com/2rPVKbL0yQ
— Star Sports (@StarSportsIndia) March 28, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आरसीबीने १९६/६ धावा काढल्यानंतर गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर चेपॉक येथे सीएसकेचा पराभव केला. आरसीबीकडून कर्णधार रजत पाटीदार (५१) ने अर्धशतक झळकावले तर कोहलीने ३० चेंडूत ३१ धावा केल्या. फिल सॉल्टने १६ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, सलामीवीर रचिन रवींद्र (३१ चेंडूत ४१) हा सीएसकेचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना धोनीने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या.
गब्बर इज बॅक! Shikhar Dhawan मुळे माझा खेळ बदलला, एलएसजीला पाणी पाजणाऱ्या ‘या’ खेळाडूची कबुली..
धोनीने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडला खातेही उघडता आले नाही. पहिल्या दोन षटकांत चेन्नईने तीन विकेट गमावल्या. राहुल त्रिपाठीने ५ धावा आणि दीपक हुड्डाने ४ धावा केल्या.