श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. आता फायनल जिंकण्यासाठी पंजाबला १९१ धावा कराव्या लागणार आहे. या सामन्या दरम्यान पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने आरसीबीचा स्फोटक सलामीवीर फिल साल्टचा एक अफलातून झेल पकडला. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हा झेल टिपला आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यरने १८ मीटर मागे धावत जात हा झेल पकडला आहे.
आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर षटकार मारून आपले खाते उघडले, पण त्याला जास्त वेळ तग धरता आला नाही. तो १६ धावांवर असताना त्याने काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव फसला आणि चेंडू हवेत खूप उंच गेला. चेंडू इतका उंच होता की तो आकाशात दिसतही नव्हता. पण तरीही, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर मागे धावत जाऊन त्याने चेंडूवर नजर ठेवून झेल टिपला. अय्यरने हा झेल पकडण्यासाठी १४ पावले मागे घेतली आणि या दरम्यान त्याने १८ मीटर अंतर कापत हा झेल पूर्ण केला.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला आज म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. आता फायनल जिंकण्यासाठी पंजाबला १९१ धावा कराव्या लागणार आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या आहेत. तर पंजाबकडून काइल जेमिसने आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत.
विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह