इराणचा मोठा डाव! रशिया-चीन नव्हे, तर 'या' NATO देशासोबत केला गुप्त करार, अमेरिका-इस्रायलला झटका (फोटो सौजन्य: ai जनरेटेड)
इराणने एका नाटो देशासोबत हातमिळवणी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इराणने मित्र देश रशिया-चीन कडे पाठ फिरवली असून नाटो देश ग्रीस सोबत मोठा गुप्त करार केला आहे. यामुळे इस्रायल आणि अमेरिकेची चिंता वाढली आहे. इराणच्या या हालचालींमुळे पश्चिम आशियातील राजकीय सीमकरणे बदलण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या इरा्णमध्ये देशांतर्गत महागाई, बेरोजगारी आणि सरकारविरोधी हिंसक आंदोलनाची परिस्थिती आहे. याच वेली अमेरिकेकडून तेहरानवर लष्करी कारवाईची संकेत मिळाले होती. अशा परिस्थितीत इराणने आपल्या धोरणात्मक रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे. इराण जागतिक पातळीवर कुटनितीसाठी नवे पर्याय शोधत आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने दोन वर्षांपूर्वी जप्त केलेल्या ग्रीसच्या तेल टँकरची सुटका केली आहे. यामुळे हा इराण आणि ग्रीसमधील गुप्त कराराचा भाग असल्याचा चर्चांणा उधाण आले आहे.
ग्रीस हा नाटो देशाचा सदस्या आहे. परंतु ग्रीसचे इस्रायलसोबतचे संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहे. ग्रीस भौगोलिकदृष्ट्या युरोप आणि मध्यपूर्व देशांना जोडणार देश आहे. यामुळे धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा देश मानला जातो. इराणच्या ग्रीससोबत कथित गुप्त करारामुळे अमेरिका-इस्रायलच्या रणनीतींनी मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील संघर्षात इराणला ग्रीसची अप्रत्यक्ष धोरणात्मक मदत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलसाठी हा मोठा धोका मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते इराण ग्रीसच्या मदतीने अमेरिका-इस्रायलवर कुटनीतिक डाव खेळथ आहे. यामुळे मध्यपूर्वेतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ही अमेरिका आणि इस्रायलसाठी मोठी डोकेदुखी मानली जात आहे.
Ans: इराणने NATO देश ग्रीससोबत गुप्त करार केल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.
Ans: अमेरिकेडून संभाव्य हलल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने आपली रणनीती बदलली आहे. NATO देशातील ग्रीस देशाशी जवळीक ही अमेरिका-इस्रायलवर दबावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयोगी ठरेल, याच हेतून इराणने ही डील केली आहे.
Ans: इराण-ग्रीस गुप्त करारामुळे भविष्यात इराणला कोणत्याही संघर्षासाठी ग्रीसकडून अप्रत्यक्ष मदत किंवा धोरणात्मक फायदा होईल. हा फायदा अमेरिकेसाठी धोकादायक आहे.






