शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
MI vs GT : आज आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. चंदीगडच्या मुल्लानपूर येथे हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होणार आहे, तर जिंकणाऱ्या संघाला अतिरिक्त सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई आणि गुजरात दोन्ही संघाची वाटचाल चांगली राहिली आहे. त्यामुळे, आज होणारा हा सामना अटीतटीचा असणार आहे. चाहत्यांचे या सामन्यात खुप मनोरंजन होणार आहे. अशा परिस्थितीत, मुल्लानपूरवर कोण राज्य करणार याबाबत आपण माहिती घेऊया.
हेही वाचा : IPL Eliminator : हार्दिकच्या मुंबईचा गिलच्या टायटन्ससमोर लागणार कस! आज GT आणि MI समोरासमोर भिडणार..
मुल्लानपूरमधील यादवींद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या मैदानावर फलंदाजांना धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. ही आकडेवारीवरुण लक्षात येते. आयपीएल २०२५ मध्ये या मैदानावर फक्त एकदाच २०० धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. पंजाबने मुल्लानपूरमध्येच फक्त १११ धावांचा बचाव करून एक इतिहास रचला होता. म्हणजेच मुंबई आणि गुजरात यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात गोलंदाजांसाठी ही खेळपट्टि मदत करणारी आहे.
मुल्लानपूरने आतापर्यंत एकूण ९ आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ सामने आपल्या नावावर केले आहेत. त्याच वेळी, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. म्हणजेच, या मैदानावर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरत नाही. मुल्लानपूरमध्ये पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६९ इतकी राहिली आहे. पंजाब किंग्जने या वर्षी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ६ विकेट गमावून २१९ धावा केल्या होत्या, जी या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या देखील राहिली आहे.
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, गेराल्ड कोएत्झी, साई किशोर, मोहम्मद सिराज.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, चरिथ असलंका/बेव्हॉन जेकब्स, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.